शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

१७६८ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:28 IST

वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालवितांना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७६८ रिक्षाचालकांवर सोमवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़ या विशेष मोहिमेतून ३ लाख ९२ हजार ६०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़

नाशिक : वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालवितांना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७६८ रिक्षाचालकांवर सोमवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़ या विशेष मोहिमेतून ३ लाख ९२ हजार ६०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़ रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याने तसेच उघडपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार विशेष रिक्षा तपासणी मोहीम राबविण्यात आली़ शहरातील तेरा पोलीस ठाणे हद्दीत २६ ठिकाणी नाकाबंदी करून रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली़ पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व २६० कर्मचारी, तर वाहतूक विभागाचे दहा अधिकारी व २२५ कर्मचारी या रिक्षा तपासणी मोहिमेत सहभागी झाले होते़या रिक्षा तपासणी मोहिमेत मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाºया एक हजार ७६८ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून ३ लाख ९२ हजार ६०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़ तसेच कागदपत्रे तसेच फिटनेस प्रमाणपत्रे नसलेल्या ६० रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या़ पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी परिसरातील मालेगाव स्टँड व निमाणी बसस्थानक परिसरात रिक्षा तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यावेळी १८८ बेशिस्त रिक्षाचालकांकडून सुमारे ३७ हजार ६०० रुपयांचा दंडवसूल करण्यात आला. अनेक रिक्षाचालकांकडे गणवेश नसल्याने दंड करण्यात आला. तसेच काही रिक्षाचालकांकडे कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक रिक्षाचालक भाविकांकडून अव्वाच्या सव्वा भाडेवसुली करतात. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून वाहतुकीच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी कागदपत्रे तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले़सिडकोत १६३ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईअंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी सिडको परिसरात रिक्षा तपासणी मोहीम राबवून १६३ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली़ त्रिमूर्ती चौक, दत्त चौक परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत कागदपत्र जवळ न बाळगणारे, फ्रंट सीट वाहतूक करणाºया चालकांवर कारवाई करून ३२ हजार ६०० रुपयांचा दंडवसूल केला, तर बहुतांशी रिक्षाचालक वाहतुकीचे नियम पाळत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी