शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

एक एकर शेतीत आधुनिक पद्धतीने साकारले रेशीम पीक

By admin | Updated: September 22, 2016 00:11 IST

यशस्वी प्रयोग : बेलगाव कुऱ्हेच्या शेतकऱ्याच्या मेहनतीला फळ; विक्रीसाठी बंगळुरूला रवाना

लक्ष्मण सोनवणे  बेलगाव कुऱ्हेयेथील शेतकरी राजाराम बाळू गुळवे यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत एक एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. पिकवलेला रेशीमचा पाला हा अळ्यांचे खाद्य असून, त्यांनी यासाठी शेडनेट उभे केले आहे. साधारण बावीस दिवसात अळ्या तयार होतात. त्यांची रेशीम बंगळुरू येथे विक्रीसाठी जात असून, यातून त्यांना दररोज चांगले उत्पन्न मिळत आहे.बेलगाव कुऱ्हेचे आदर्श शिक्षक विष्णू बोराडे यांनी रेशीम शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले असून, ते शेतीबद्दल उपयुक्त मार्गदर्शन त्यांना करत आहेत. या रेशीम पीक प्रयोगामुळे गुळवे यांना विक्रमी उत्पादन मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. शेतीविषयक अभ्यास करून ते या शेतीची विशेषकाळजी घेत त्यांनी निसर्गाच्या चहूबाजूने येणाऱ्या संकटावर मात केली आहे.नवीन प्रयोगात त्यांची पत्नी सिंधूबाई, आई चंद्रभागाबाई, मुलगी कोमलदेखील त्यांना सातत्याने मदत करीत असतात.इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हेसारख्या कमी पाणी असलेल्या ठिकाणी त्यांचा प्रयोग पाहून तालुक्यातील काही शेतकरीही शेती करण्यास आता सरसावले आहेत. आणि विशेष म्हणजे यात कीटशनाशक फवारणीचीदेखील गरज भासत नाही.शेतीकडे पाठ फिरवणाऱ्या तरुणवर्गासाठी स्वयंपूर्णत: हा व्यवसाय आहे. तालुक्यात हा पहिलाच प्रयोग आहे. केल्याने होत आहे रे.. या उक्तीप्रमाणे गुळवे यांनी ही शेती करून दाखवली आहे. क मी श्रम, कमी मनुष्यबळ; परंतु तितकेच सुंदर असे नियोजन त्यांच्या या रेशीम उद्योगात दिसून येते. त्यांनी केलेली ही शेती अगदी निसर्गरम्य दिसते. तालुक्यातील शाळांनी या परिसरात सहल या ठिकाणी नेल्यास मुले हा रेशीम उद्योग आयुष्यभर विसरणार नाहीत.शेतीविषयक अभ्यास करून बेलगाव कुऱ्हेसारख्या कमी पाणी असलेल्या ठिकाणी शिक्षक विष्णू बोराडे यांच्या मार्गदर्शनाने सहज विरु ंगळा म्हणून उभा केलेला रेशीम पीक हा नवीन प्रयोग यशस्वी होऊन विक्र मी उत्पादन मिळत आहे.- राजाराम गुळवे, शेतकरी