शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्यांची साधली पर्वणी

By admin | Updated: June 25, 2017 00:22 IST

सलग तीन दिवस सुट्या जुळून आल्यामुळे नाशिककरांनी ‘वीकेण्ड टुरिझम’ला पसंती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह विविध तालुक्यांमध्ये आद्राच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली तसेच सलग तीन दिवस सुट्या जुळून आल्यामुळे नाशिककरांनी ‘वीकेण्ड टुरिझम’ला पसंती दिली.चौथा शनिवार आणि सोमवारी रमजान ईदनिमित्त असलेली शासकीय सुटीमुळे बॅँका, खासगी व शासकीय कार्यालये दिवस बंद राहणार असल्यामुळे शहरातील नोकरादारवर्गाने पर्यटनाचा बेत आखला आहे. तालुक्यांमधील परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल्ल झाले आहे. नागरिकांनी सलग तीन दिवसांच्या सुटीची संधी साधत वीकेण्ड पर्यटनासाठी आगाऊ नोंदणी राज्य पर्यटन महामंडळासह विविध खासगी संस्थांकडेही केली आहे. वीकेण्डचा बेत आणि त्यातच सुरू झालेली संततधारेने पर्यटकांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला आहे.  शहरात जरी सकाळी पावसाला सुरुवात झाली असली तरी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, चांदवड, निफाड या तालुक्यांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. या भागातील निसर्ग सौंदर्य वाढत असून, मुंबई, पुणे, नाशिकच्या पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचे आकर्षण होत आहे. यामुळे अनेकांनी शनिवारी पावसाच्या संततधारेमध्येच पर्यटनस्थळी कूच केले. इगतपुरीजवळील भावली धरण परिसरासह, त्र्यंबकेश्वर जवळील पेगलवाडी, पहिने, मोखाडा रस्ता, गंगापूर धरण परिसर, काश्यपी धरणाजवळील वाघेरा घाट परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. डोंगरमाथ्यावरून कोसळणारे पाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि पावसाच्या संततधारेचा आनंद घेत धम्माल केली.