शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मनमानी पद्धतीने मतदार यादी केल्याचा आरोप

By admin | Updated: December 25, 2014 01:50 IST

मनमानी पद्धतीने मतदार यादी केल्याचा आरोप

येवला : येवला औद्योगिक सहकारी वसाहत संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणूक कार्यक्रमास दिलीप तक्ते व संजय कांबळे या दोन सभासदांनी जोरदार हरकत घेतली आहे. प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांनी मनमानी करून स्वत:च्या अधिकारात तात्पुरती मतदार यादी तयार करून घेतली असल्याचा आरोप केला आहे. यामुळे वसाहतीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासंबंधी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात उभयतानी म्हटले आहे, तात्पुरत्या मतदार यादीमध्ये दाखवलेल्या सभासदांपैकी अनेक सभासद मतदानास अपात्र आहेत. त्यांनी सहकार कायदा व पोटनियमानुसार सभासदत्वाचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नाही. निवडणूक प्रक्रियेसाठी नियमावली तयार केलेली नाही. जोपर्यंत नियमावली तयार होत नाही तोपर्यंत निवडणूकप्रक्रिया सुरू करता येत नाही. कोणत्या मतदारसंघातील सभासदाने कोणास मतदान करावयाचे याबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. संबंधित निवडणूक सहकार कायद्यातील तरतुदीनुसार बेकायदेशीर होणार आहे. कारखानदार मतदारसंघातून आठ प्रतिनिधी घेणे आवश्यक आहे. तशी तरतूद पोटनियम क्र. १ चा १२ (अ) मध्ये आहे. कारखानदार या व्याखेला पात्र असलेले सहकारी संस्था व ट्रस्ट अ‍ॅक्टखाली नोंदवलेल्या संस्थांना या निवडणुकीत भाग घेता येतो. पोटनियम या नियमानुसार निवडणूक कोणत्या जागेसाठी व किती प्रतिनिधीसाठी आहे हे निवडणूक कार्यक्रमात कोठेही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर आहे, असे निवेदनात म्हटले आहे. हरकतीचा विचार करून तत्काळ निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. मतदार यादीत अनेक दोष असल्याने नियमानुसार सभासद यादी बनवावी असे निवेदनात म्हटले असून, काही संस्था सभासदत्वाचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करत नसल्यामुळे त्या संस्थांना मतदार यादीतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (वार्ताहर)