शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

समको माजी संचालकांकडून पक्षपातीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:34 IST

नाशिक : सटाणा मर्चंट सहकारी बँकेच्या संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या अपिलात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप बँकेचे माजी संचालक विठ्ठल येवलेकर आणि विजय भांगडिया यांनी मंगळवारी (दि.५) पत्रकार परिषदेत केला. समको बँकेच्या तीन संचालकांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून दाखल केलेले अपील निकाली काढण्यापूर्वी तज्ज्ञांकडून स्वाक्षरीची तपासणी न करता विभागीय सहनिबंधकांनी दीड महिन्यात जवळपास १४ ते १५ वेळा सुनावणी घेऊन या प्रकरणाचा एकतर्फी निपटारा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून, या प्रकरणी दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी १३ फेब्रुवारीला घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही आरोपकर्त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देअपिलाबाबत विभागीय सहनिबंधकांवर आरोप; न्यायालयात दाद मागणार

नाशिक : सटाणा मर्चंट सहकारी बँकेच्या संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या अपिलात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप बँकेचे माजी संचालक विठ्ठल येवलेकर आणि विजय भांगडिया यांनी मंगळवारी (दि.५) पत्रकार परिषदेत केला. समको बँकेच्या तीन संचालकांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून दाखल केलेले अपील निकाली काढण्यापूर्वी तज्ज्ञांकडून स्वाक्षरीची तपासणी न करता विभागीय सहनिबंधकांनी दीड महिन्यात जवळपास १४ ते १५ वेळा सुनावणी घेऊन या प्रकरणाचा एकतर्फी निपटारा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून, या प्रकरणी दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी १३ फेब्रुवारीला घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही आरोपकर्त्यांनी दिला आहे.विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे कोरम पूर्ततेसाठी दाखल केलेल्या अपिलावर तज्ज्ञ संचालक गौरव जैन, विक्रम मेहता व शरद सोनवणे यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली. त्याविषयी या संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे लेखी हरकत घेतली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून विभागीय सहनिबंधकांनी दीड महिन्यात १४ ते १५ सुनावण्या घेऊन ही फाईल निर्णयासाठी बंद केली. या कालावधीत वारंवार विनवणी करूनही बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला नाही. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले नाही आणि बनावट स्वाक्षºयांच्या आधारे हे अपील निकाली काढण्याचा घाट घातला गेल्याचा आरोप डॉ. विठ्ठल येवलेकर व विजय भांगडिया यांनी केला आहे. या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनोज अमृतकर, यशवंत येवला आदी माजी संचालकही उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी, आपण दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची समान संधी दिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर अधिक बोलणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बॅँकेवर प्रशासकाची नियुक्तीकळवण, मालेगाव, सटाणा पट्ट्यातील स्थानिक बँकांमध्ये अग्रस्थानी असलेल्या समको बँकेत १७ संचालकांचे कार्यकारी मंडळ आहे. परंतु, यापैकी विविध कारणांनी सहा संचालक अपात्र ठरल्यानंतर बँकेच्या उपाध्यक्षांसह तीन संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे कोरमअभावी बँक बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आला.