शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयास वृक्षतोडीची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:36 IST

प्राधिकरणची बैठक : एकास दहा झाडे लावण्याचा प्रस्ताव नाशिक : जिल्हा रुग्णालय परिसरात २०० खाटांच्या इमारत बांधकाम क्षेत्रात अडथळा ठरणारे २७ वृक्षांचे पुनर्रोपण आणि ३ वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली मात्र, या तीस झाडांच्या बदल्यात तीनशे झाडे लावण्याचा प्रस्तावही जिल्हा रुग्णालयापुढे ठेवण्यात आला आहे. समितीने वृक्षतोडीस अटी-शर्तीवर परवानगी दिल्याने इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्राधिकरणची बैठक : एकास दहा झाडे लावण्याचा प्रस्ताव

नाशिक : जिल्हा रुग्णालय परिसरात २०० खाटांच्या इमारत बांधकाम क्षेत्रात अडथळा ठरणारे २७ वृक्षांचे पुनर्रोपण आणि ३ वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली मात्र, या तीस झाडांच्या बदल्यात तीनशे झाडे लावण्याचा प्रस्तावही जिल्हा रुग्णालयापुढे ठेवण्यात आला आहे. समितीने वृक्षतोडीस अटी-शर्तीवर परवानगी दिल्याने इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने आॅगस्टमध्ये ५५ बालके दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यावेळी, जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाकडून वाढीव इन्क्युबेटर्ससाठी नवीन कक्ष उभारणीच्या प्रस्तावात वृक्षांचा अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते शिवाय, महापालिकेकडे वृक्षतोडीसाठी अर्ज देऊनही परवानगी मिळत नसल्याचा कांगावाही करण्यात आला होता. मात्र, एका जनहित याचिकेनुसार, वृक्षतोडीसंबंधी न्यायालयाची स्थगिती असल्याने उच्च न्यायालयाकडूनच परवानगी मिळविण्याचे महापालिकेने जिल्हा रुग्णालयाला सूचित केले होते. दरम्यान, वृक्ष प्राधिकरण समितीची पूर्ण रचना झाल्यानंतर गुरुवारी (दि.१४) समितीची पूर्ण कोरमसह पहिली बैठक झाली. या बैठकीत जिल्हा रुग्णालय परिसरातील २७ वृक्ष पुनर्रोपण करणे आणि ३ वृक्षांची तोड करण्यासंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर चर्चा होऊन, २७ पुनर्राेपित वृक्षांच्या बदल्यात २७० तर तोडण्यात येणाºया ३ वृक्षांच्या बदल्यात ३० याप्रमाणे एकूण ३०० वृक्षांची लागवड करण्याच्या अटीवर वृक्षतोडीस परवानगी देण्यात आली. पुनर्रोपित वृक्षांची देखभालही जिल्हा रुग्णालयानेच करायची असून, नवीन वृक्षांची लागवड करताना ती दहा फुटांवरील असावी, अशीही अट घालण्यात आली. जिल्हा रुग्णालयाने नवीन वृक्षांची लागवड त्यांच्या स्वत:च्या जागेत करायची असून, जागा अपुरी पडल्यास महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. ...तरीही न्यायालयाचीपरवानगी अनिवार्य !वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्ष पुनर्रोपण व काही वृक्ष तोडण्यास परवानगी दिली असली तरी, जिल्हा रुग्णालयाला उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज करून परवानगी घ्यावी लागणार आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमार्फतही समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती उच्च न्यायालयाला सादर केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी दिली.