सातपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सातपूर विभागात एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. या एका अर्जामुळे सातपूरला उमेदवारीचे खाते उघडले गेले. महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि. २७ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारांना आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहेत. त्याची प्रत काढून निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवली आहे. पहिल्या तीन दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नव्हता. चौथ्या दिवशी प्रभाग क्र. ८ मधील एका उमेदवाराने सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भालचंद्र बेहरे, तर सहायक अधिकारी म्हणून बबन काकडे काम पाहत आहेत. (वार्ताहर)
सातपूरला उघडले खाते
By admin | Updated: January 31, 2017 00:22 IST