शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

२०११च्या जनगणनेनुसारच योजनांचा लाभ देणार

By admin | Updated: August 23, 2016 00:31 IST

दादा भुसे : बैठकीत पेसाची अपूर्ण कामे, डासमुक्त गाव अभियान, ई-लर्निंगवर चर्चा

नाशिक : राज्य सरकारकडील सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी आता सन २०११ च्या जनगणनेनुसारच लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.नाशिक जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सोमवारी (दि.२२) दुपारी रावसाहेब थोरात सभागृहात दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयेजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार अनिल कदम, आ.दीपिका चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार राजाभाऊ वाजे, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, उषा बच्छाव, शोभा डोखळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, विभागीय उपआयुक्त सुखदेव बनकर, अश्विन मित्रगोत्री यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख व पंचायत समिती सभापती तसेच निवडक जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. स्वच्छता अभियानाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी माहिती दिली. यावर्षी २०८ गावे संपूर्ण निर्मलग्राम करण्याचे उद्दिष्ट असताना ४५ गावे आतापर्यंत शंभर टक्के हागणदारीमुक्त झाली आहेत. यावर्षी ७३,३३३ शौचालये बांधण्याचे तसेच ४०० गावे शंभर टक्केहागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आमदार नरहरी झिरवाळ व आमदार अनिल कदम यांनी वैयक्तिक शौचालयाचे पैसे अद्याप लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. त्यासाठी कमिशनची मागणी केली जाते, असा आरोप केला. पूर्णत्वाचा दाखला बाकी असल्यानेच कामे अपूर्ण दिसत असल्याचे अनिल लांडगे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी नांदेडसह मराठवाड्यात डासमुक्त गाव ही संकल्पना चांगली रूजत असल्याने संपूर्ण राज्यभर ही डासमुक्त गावाची संकल्पना आपण राबविण्यार असून, त्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना एकेक गाव दत्तक घेण्याचे सूचित करण्यात येईल, असे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तसेच बैठकीस मार्गदर्शन करताना सांगितले की, यापुढे २०११ चीच जनगणना व २०११ची दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या सर्व योजनांसाठी ग्राह्ण धरली जाणार आहे. यापुढे २००७ची जनगणना व २००७ ची दारिद्र्य रेषेखालील यादी ग्राह्ण धरली जाणार नसल्याचे दादा भुसे यांनी सांंगितले. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल स्कूल व ई-लर्निंग प्रक्रिया राबवून खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तोडीस तोड शाळा बनवून जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा व गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)