शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटना टळली : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे देवगिरी एक्स्प्रेस बचावली

By admin | Updated: August 3, 2016 00:27 IST

कसारा घाटात मध्यरात्री रेल्वेमार्गावर दरड कोसळली

इगतपुरी : कसारा घाटातील रेल्वेमार्गावर काल मध्यरात्री दरड कोसळल्याने मुंबईहून नाशिकडे येणारा एकेरी रेल्वेमार्ग ठप्प झाला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे देविगरी एक्स्प्रेस कसारा स्थानकातच थांबविण्यात आल्याने त्यातील प्रवाशी बचावले.गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरीत धो धो पाऊस पडत असल्याने काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कसारा घाटातील टी. जी. आर. ३ जवळील जव्हार फाट्याजवळ रेल्वे रुळावर मोठी दरड कोसळली. त्याचदरम्यान कसारा स्थानकातून मुंबईहून नाशिककडे येणारी देविगरी एक्स्प्रेस नाशिककडे सोडण्यात आली. मात्र घाटात दरड कोसळल्याची रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच सदर घटनेची माहिती त्यांनी कसारा स्थानकात कळविली. माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने देविगरी एक्स्प्रेस थांबवल्याने मोठी दुर्घटना व जीवितहानी टळली. सदरची एक्स्प्रेस पुन्हा कसाऱ्याच्या दिशेने माघारी फिरवून दुसऱ्या ट्रॅकवर आणून नाशिकला रवाना करण्यात आली.या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. देविगरी एक्स्प्रेस थोडक्यात बचावली. रात्री साडे बारा ते सकाळी 9 वाजेपर्यंत या अपघात ठिकाणी मातीचा ढिगारा उपसण्याचे काम चालू होते. सकाळी ९ वाजता हा रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले. (वार्ताहर)