शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

नांदूरशिंगोटेत अपघात; आईसह दोन मुलांचा मृत्यू

By admin | Updated: June 3, 2016 23:40 IST

काळाचा घाला : उभ्या ट्रकवर कार आदळली

नांदूरशिंगोटे : उभ्या ट्रकवर इंडिगो कार आदळून झालेल्या भीषण अपघातात संगमनेर येथील बेग कुटुंबातील आई व दोन मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे शिवारात सदर अपघात झाला. संगमनेर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक इसाक उमार बेग हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत कसारा येथे नातेवाइकांच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. कसारा येथून गुरुवारी दुपारी ते संगमनेरकडे आपल्या इंडिगो कारने (क्र. एमएच १६ एबी ४१५७) परत निघाले होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बेग यांची इंडिगो नांदूरशिंगोटे शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकवर (क्र. एमएच १२ एफसी ७३१७) जाऊन धडकली. ट्रकचालक ट्रक रस्त्याच्या कडेला उभी करून हॉटेलमध्ये जेवण करीत होता. ट्रकवर कार आदळताच मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या भीषण धडकेमुळे कारमधील सना इसाक बेग (२५) यांच्यासह त्यांची सात वर्षीय मुलगी माविया व दोन वर्षाचा मुलगा अली यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मृतांचे शवविच्छेदन संगमनेर येथील पालिका रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)