शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी हायवेवर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या कारला अपघात; तिघे जखमी

By अझहर शेख | Updated: October 11, 2023 17:26 IST

श्रीरामपूर ते मुंबई नाशिकमार्गे असा प्रवास बुधवारी (दि.११) नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून करत होता.

नाशिक : श्रीरामपूर ते मुंबई नाशिकमार्गे असा प्रवास बुधवारी (दि.११) नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून करत होता. घोटी ओलांडल्यानंतर इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात त्यांचे मोटार समोरच्या ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे त्यांच्या पायांना व चेहऱ्याला दुखापत झाली असून खांद्याला मुका मार लागला आहे. तातडीने पोलिस व रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याने जखमींवर तेथेच प्रथमोपचार देण्यात आले. मिसर यांच्यासह सहायक वकिल व वाहनचालक यांची प्रकृती स्थिर आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी, न्यायालयीन कामकाजासाठी ॲड अजय मिसर, सहायक वकील प्रथमेश शिंगणे हे श्रीरामपुर तालुका न्यायालयात बुधवारी सकाळी गेले होते. तेथील खटल्याच्या सुनावणीचे कामकाज आटोपून मिसर यांचा ताफा नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून निघाला. एस्कॉर्ट जीप ही टाटा सफारी कारच्या (एम.एच०१ सीपी १६१८) पाठीमागे होती तर सफारी कारमधून अजय मिसर, शिंगणे हे प्रवास करत होते. चालक सचिन भोईंजकर हे कार चालवत हाेते.

भरवीर गावाच्या शिवारात कार पोहचली असता समृद्धी महामार्गावर कारपुढे चालत असलेल्या ट्रकच्या चालकाने अचानकपणे वेग कमी केला. यामुळे भोईंजकर यांना कारच्या वेगावर त्वरित नियंत्रण मिळविणे अवघड झाल्याने कार ट्रकवर पाठीमागून जाऊन आदळली. हा अपघात दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात कारमध्ये असलेले सर्वच बचावले. यानंतर नाशिकच्या दिशेने मिसर माघारी आले.