शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी-वडनेर रस्त्यावर दुभाजकांअभावी अपघात

By admin | Updated: October 19, 2015 22:31 IST

पाथर्डी-वडनेर रस्त्यावर दुभाजकांअभावी अपघात

पाथर्डी फाटा : पाथर्डी फाटा ते वडनेरगेट दरम्यानच्या रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आले असले तरी, या रस्त्यावर दुभाजक न टाकल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्ता मोठा होऊनही अपघातांचा धोका कमी न झाल्याने येथून जाताना वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. पाथर्डी फाटा येथून वडनेर गेट, देवळाली कॅम्प, नाशिकरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या पाच-सहा वर्षांत प्रचंड रहदारी वाढली आहे. मुंबईकडून-पुण्याकडे आणि सिडको सातपूरकडून नाशिकरोडकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व दुभाजक टाकावे, अशी मागणी परिसरातील नागरिक सातत्याने करीत असून दुभाजक न टाकल्याने अपघातांचा धोका कमी होण्याऐवजी वाढला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा रस्ता रुंद करताना चौपदरी वाटावा एवढा मोठा झाला. असे असूनही त्याला दुभाजक न टाकल्याने वाहने समोरासमोर येऊन ओव्हरटेक करताना अपघातांची शक्यता वाढली आहे. रस्ता चांगला झाल्याने वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवू लागली आहेत. या रस्त्याला अपघाती वळण आहेत. परिणामी अपघात टाळण्यासाठी दुभाजक टाकणे अत्यावश्यकच होते. मात्र त्याकडे संबंधितांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहे. रस्त्यावर तातडीने दुभाजक टाकावेत, अशी मागणी बी. व्ही. गायकवाड, कमल अग्रवाल, सागर देवरे, भाऊसाहेब पाटील, विजय सोनवणे आदिंसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)