शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गळती लागलेल्या मनसेत प्रवेश सोहळा

By admin | Updated: January 18, 2017 00:15 IST

राजगड : दीर्घकालावधीनंतर ढोल-ताशांचा गजर

नाशिक : ज्या पक्षाला आतापर्यंत ४० पैकी २७ नगरसेवकांनी गुडबाय केले, येत्या निवडणुकीत ज्याचा काहीच प्रभाव राहणार नाही, असे विरोधक म्हणत आहेत, त्या मनसेचे ‘राजगड’ कार्यालय मंगळवारी पक्षप्रवेश सोहळ्यामुळे गजबजले होते. एकीकडे गळतीमुळे पक्षाचे भवितव्य धूसर बनले असताना बिथरलेल्या कार्यकर्त्यांसाठी पक्षप्रवेश सोहळा दिलासा देणारा ठरला. त्यामुळे दीर्घकालावधीनंतर पक्षकार्यालयाबाहेर ढोल-ताशांचा गजर ऐकायला मिळाला. महापालिकेत पाच वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या मनसेच्या सर्वाधिक २७ नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षाशी घरोबा केला आहे. मनसेने सत्ताकाळात काहीच नवनिर्माण केले नसल्याची टीका सेना-भाजपासह अन्य विरोधी पक्षांनी सातत्याने केली. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर होणार असल्याचे दावे विरोधकांकडून केले जात आहेत. माजी आमदारापासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंत अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे मनसेची एकूणच झालेली वाताहत कार्यकर्त्यांना अस्वस्थ करून सोडणारी ठरली.  पक्ष सोडून जाणाऱ्यांचीच गेले काही दिवस चर्चा होत राहिली मात्र पक्षात कुणी प्रवेश केल्याची खबर येत नव्हती. खिळखिळ्या झालेल्या पक्षाच्या एकूणच भवितव्याबद्दलही चर्चा होत राहिली. येत्या निवडणुकीत पक्षाला उमेदवारही मिळणार नाहीत, असा दावा विरोधक करत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी ‘राजगड’ कार्यालयात काही कार्यकर्त्यांचा झालेला पक्षप्रवेश सोहळा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारा ठरला. (प्रतिनिधी)