शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर गावाहून येणाऱ्यांना प्रवेशबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:41 IST

बागलाण तालुक्यात चार दिवसांत पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, नाशिक, नगर येथून गावाकडे मोठ्या प्रमाणात लोंढे आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता गावागावातील प्रवेशद्वाराजवळ बाहेरून येणाºया व्यक्तींना प्रवेशाला बंदी असल्याचे फलक झळकू लागले आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असलेल्यांची पंचायत झाली आहे.

ठळक मुद्देप्रवेशद्वारावर झळकताहेत फलक : स्थलांतरित कुटुंबीयांची पंचाईत

सटाणा : बागलाण तालुक्यात चार दिवसांत पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, नाशिक, नगर येथून गावाकडे मोठ्या प्रमाणात लोंढे आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता गावागावातील प्रवेशद्वाराजवळ बाहेरून येणाºया व्यक्तींना प्रवेशाला बंदी असल्याचे फलक झळकू लागले आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असलेल्यांची पंचायत झाली आहे.बागलाण तालुक्यातील पन्नास हजाराहून अधिक नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. मात्रकोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने थैमान घातल्याने अनेकांनी आपल्या मूळ गावाची वात धरली आहे. लोंढेच्या लोंढे येत असल्याने ग्रामीण भागात येत आसल्याने धास्तावलेल्या ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच बाहेरगावहून येणार्यांनी गावात न येण्याचे आवाहन करणारे फलक झळकविले आहेत. केरसाणे येथे पुणे येथील तसेच उस तोडणीला गेलेल्या मजुरांना सर्दी-खोकला झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान एकाने सटाण्यातील एका नामांकित डॉक्टरकडे उपचार घेतल्याने अफवांमध्ये अधिकच भर पडली असून आरोग्य विभागच्या पथकाने आपल्या निगराणीखाली या संशियत रु ग्णांना ठेवावे अशी मागणी सरपंच संजय अहिरे यांनी केली आहे. गावात कोरोनाबाबत अफवांचे पेव फुटल्याचे चित्र असून गावागातील प्रवेशद्वाराजवळ बाहेरून येणार्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेशबंदी करून काळजी घेताना दिसत असले तरी गावाकडे परतणार्या भावांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची पंचाईत होत आहे.बागलाणमध्ये परदेशातून आलेल्या नऊ जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आलेले आहे. त्यापैकी एकाचे मेडिकल रिपोर्ट आले असून, कोरोना निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान, संचारबंदीत काम करणाºया पोलीस कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, ग्रामसेवक, शासकीय कर्मचार्यांना मास्क आदी उपलब्ध नसल्यामुळे भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या