नाशिक : नव्याने निर्मित झालेल्या नगरपंचायत, नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून आता राजकारण सुरू झाले असून, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचे निकष धाब्यावर बसवून करण्यात आलेल्या या नियुक्त्या संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता अनेक नगरसेवक व विरोधकांनी याबाबत जिल्हा दंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात पेठ, कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड व निफाड नगरपंचायत व नगर परिषद पंचवार्षिक निवडणुका झाल्या. त्यात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या करताना राजपत्रात नमूद केलेले नियम व निकष डावलून या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. स्वीकृत नगरसेवक नियुक्त करताना एकूण नगरसेवक संख्येच्या दहा टक्के किंवा पाच नगरसेवक यापैकी जी संख्या कमी असेल त्यासंख्येपेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात तज्ज्ञांचीच नियुक्ती करण्याचेही स्पष्ट आहे. मात्र, हे सारे नियम धाब्यावर बसवून आपापल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची व निकटवर्तीयांचीच वर्णी लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. ते नियमबा' असल्याचा दावा करीत काही विरोधक थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच याबाबत दाद मागणार आहेत. त्याअनुषंगाने त्यांनी तयारी केल्याचे समजते. (प्रतिनिधी)दुचाकी लंपास नाशिक : कॉलेजरोडवरील पाटील लेनमधील रहिवासी रोहित लालमणी विश्वकर्मा यांची २५ हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी (एमएच १५, ईसी १३१७) युनियन आॅफिसच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती नियम डावलून?
By admin | Updated: December 8, 2015 23:15 IST