शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून लाचलुचपत पेचात

By admin | Updated: March 25, 2017 01:14 IST

नाशिक : नांदगावच्या कथित जमीन घोटाळ्यानंतर बागलाणच्या जमीनमालकांच्या आड महसूल खात्यावर कुरघोडी करू पहात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला बागलाणच्या जमीन मालक शेतकऱ्यांनी चांगलेच अडचणीत आणले

नाशिक : नांदगावच्या कथित जमीन घोटाळ्यानंतर बागलाणच्या जमीनमालकांच्या आड महसूल खात्यावर कुरघोडी करू पहात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला बागलाणच्या जमीन मालक शेतकऱ्यांनी चांगलेच अडचणीत आणले असून, मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी बेकायदेशीरपणे जमिनी शासनजमा करून पैशांच्या लाभासाठी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.  शुक्रवारी बागलाणच्या जागा मालक पंचवीस शेतकऱ्यांनी नाशिकला धाव घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या उपअधीक्षकांची भेट घेऊन संयुक्त निवेदन सादर केले आहे. नांदगावच्या कथित जमीन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्या इशाऱ्यावरून गुन्हा दाखल केल्याचा उघड आरोप महसूल खात्याकडून करण्यात येत असताना, लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानेही या आरोपाला पुष्टी देणारी पावले उचलली होती. नांदगावप्रमाणेच कळवण, सुरगाणा व बागलाण या तीन तालुक्यांतही नवीन शर्तींच्या व इनाम जमिनींच्या व्यवहारात अनियमितता झाल्याची माहिती पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिली, परिणामी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळवण, सुरगाणा व बागलाण या तीन तालुक्यांतील जमिनींच्या व्यवहारांची माहिती मागविली होती. ही माहिती मागविताना महसूल खात्याला अडचणीत आणण्याचाच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा मनसुबा होता. तथापि, बागलाण तालुक्यातील भिल्ल व इनाम वतनाच्या जमिनींबाबतही रामचंद्र पवार यांनी चुकीची कारवाई करून जवळपास पंचवीस शेतकऱ्यांच्या जमिनी शासन जमा केल्या होत्या. पवार यांच्या कारवाईविरोधात बागलाणच्या शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता, विभागीय आयुक्तांनी पवार यांची कृती बेकायदेशीर ठरवित जागा मालकांच्या बाजूने निर्णय दिला. नेमका त्याचाच आधार घेत बागलाणच्या जागा मालक शेतकऱ्यांनी एकत्र येत शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला धडक दिली. रामचंद्र पवार यांनी इनाम वतनाच्या जमिनींबाबत पैशाचा हेतू ठेवून आमच्या जमिनी बेकायदेशीरपणे शासन जमा करून पदाचा गैरवापर केला आहे. त्यांची ही कृती लोकसेवक पदाचे गुन्हेगारी वर्तन असून, अशाच प्रकारात नांदगावच्या जमिनी शासन जमा करून पवार यांनी जमीन मालकाकडून लाचेची मागणी केली होती. त्यामुळे बागलाणच्या जमिनी सरकार जमा करण्यामागे त्यांचा हाच हेतू असल्याचे स्पष्ट झाल्याने पवार यांच्या विरोधात लाचलुचपत कायद्यान्वये तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर जगदीश पाटील,  दाजी काकुळते, सोमनाथ सूर्यवंशी, समाधान अहिरे, शांताराम काकुळते, प्रशांत अहिरे, दोधा गोयकर, सयाजी कुलाल, बंडू बिचकुले, अनिल बेडीस, बापू सावकार, भाऊसाहेब बच्छाव, दशरथ बच्छाव, विजय देसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)