शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चौथीच्या मुलींशी गैरवर्तन; दोषी शिक्षक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:14 IST

नाशिक : शाळेतीलच इयत्ता चौथीच्या मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २०१६ मध्ये निफाड येथील देवीचा माथा जिल्हा परिषदेच्या शाळेत सदर प्रकार घडला होता. या प्रकरणाची गेल्या दोन वर्षांपासून चौकशी सुरू होती. चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुनासर दोषी आढळलेल्या शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकारवाई : निफाड जि. प. शाळेतील प्रकार

नाशिक : शाळेतीलच इयत्ता चौथीच्या मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २०१६ मध्ये निफाड येथील देवीचा माथा जिल्हा परिषदेच्या शाळेत सदर प्रकार घडला होता. या प्रकरणाची गेल्या दोन वर्षांपासून चौकशी सुरू होती. चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुनासर दोषी आढळलेल्या शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.सन २०१६ मध्ये निफाड येथील देवीचा माथा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत प्राथमिक शिक्षकाने इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले होते. या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात सदर शिक्षक दोषी आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.निफाड येथील देवीचा माथा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निंबाजी काकुळते हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. २७ सप्टेंबर २०१६ रोजी सदर शिक्षकाने इयत्ता चौथीतील विद्यार्थिनींशी मधल्या सुटीत शालेय आवारात अश्लील वर्तन केले होते, तसेच असमाधानकारक कामकाज, विद्यार्थ्यांना मारहाण करणे अशाप्रकारे त्यांच्यावर दोषारोप लावण्यात आले होते. याबाबत त्यांची गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत खाते चौकशी करण्यात आली होती. त्यांनी याबाबत चौकशी करून काकुळते यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध होत असल्याचा अहवाल सादर केला होता. दरम्यान या कारवाईचे परिसरातून स्वागत केले जात आहे.सदर दोषी शिक्षकास महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे भाग ४ मधील कलम ७ नुसार बडतर्फीची अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांचा खुलासा परिस्थितीजन्य नसल्याने अमान्य करण्यात आला असून, त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियमानुसार सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.