शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धरणात मुबलक साठा; दोन वेळ करा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:20 IST

शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता जायकवाडीही पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, दोन वेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बुधवारी (दि.२७) शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन सादर केले.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता जायकवाडीही पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, दोन वेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बुधवारी (दि.२७) शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी, आयुक्तांनी पाणीपुरवठा वितरणाची माहिती मागवत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासित केले.महापालिकेतील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले, शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे जवळपास शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे शहराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाला शहरापेक्षा ज्या जायकवाडी धरणाला नाशिककरांचे हक्काचे पिण्याचे पाणी सोडण्याची घाई असते, ते धरणदेखील पूर्णपणे भरून विसर्ग केला जात आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही शहरातील कित्येक भागात केवळ एक वेळ पाणीपुरवठा अत्यंत अपुºया दाबाने केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजेइतकेही पाणी उपलब्ध होत नाही. त्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी असूनही टंचाईची स्थिती असल्याने लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता लक्षात घेता शहरातील सर्व भागात दोन वेळचा पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. यावेळी सेना नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील पाणीपुरवठ्यासंबंधीच्या अडचणी कथन केल्या. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना पाचारण करत त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे.