शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल घरफोड्या ‘इंद्या’स अटकवर्षभरापासून होता फरार

By admin | Updated: June 15, 2014 18:25 IST

: पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त

 

इंदिरानगर : पोलिसांच्या नाकीनव आणणारा व वर्षभरापासून फरार असलेला अट्टल घरफोड्या ‘इंद्या’सह त्याच्या दोन साथीदारांना इंदिरानगर पोलिसांनी शिताफ ीने अटक केली़ या तिघांकडून सुमारे पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शहरातील अनेक घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़वडाळागाव परिसरात भुरट्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग, घरफोड्या करण्यात पटाईत असलेला अट्टल गुन्हेगार इंद्या ऊर्फ विशाल वसंत बंदरे (१९, सावित्रीबाई झोपडपट्टी) हा गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता़ तो वडाळागावात आल्याची गुप्त माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाला मिळाली़ त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांची टीम वडाळागावात पोहोचली़ पोलिसांना पाहताच इंद्याने नेहमीप्रमाणे पलायनास सुरुवात केली असता पोलिसांच्या टीमने त्याला शिताफ ीने पकडले़ पोलिसांनी इंद्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदार संशयित विशाल संजय बोरसे (२०, रा़ शिंदे, पळसे) याच्या मदतीने घरफ ोड्या केल्याची कबुली दिली़ या चोरीतील एक एलसीडी टीव्ही संशयित अस्लम शेख (३०, रा़ सावित्रीबाई झोपडपट्टी) याला विकला असल्याची माहिती दिल्यानंतर हा एलसीडी पोलिसांनी जप्त केला़ दरम्यान, या तिघाही संशयितांकडून पन्नास हजार रुपयांचा ऐवज जप्त केला़ त्यामध्ये एलसीडीसह चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे़पोलीस उपआयुक्त डॉ़ डी़ एस़ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ श्रीमनवार, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली़(वार्ताहर)