शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रिझोफेनियाचे सुमारे ८० टक्के रुग्ण उपचारापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:18 IST

आजही मानसिक आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर अज्ञान, तिरस्कार व कलंकाची भावना आहे़ सर्वसाधारणपणे १ टक्का लोकांना गंभीर मानसिक आजार (मेजर मेंटल डिसआॅर्डर) व ५ ते ६ टक्के लोकांना सामान्य मानसिक आजार (कॉमन मेंटल डिसआॅर्डर) होण्याची शक्यता असते.

नाशिक : आजही मानसिक आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर अज्ञान, तिरस्कार व कलंकाची भावना आहे़ सर्वसाधारणपणे १ टक्का लोकांना गंभीर मानसिक आजार (मेजर मेंटल डिसआॅर्डर) व ५ ते ६ टक्के लोकांना सामान्य मानसिक आजार (कॉमन मेंटल डिसआॅर्डर) होण्याची शक्यता असते. मात्र, आजही सुमारे ८० टक्के रुग्ण मानसिक आजाराच्या उपचारापासून दूर आहेत़ या आजारात औषधोपचार, मानसोपचार आणि क्वचित हॉस्पिटलायजेशन व अन्य उपचारांची आवश्यकता असून, वेळेवर उपचार व उपचारातील सातत्यामुळे या आजारातून रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतो, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे़  मानसिक आजार झालेल्या रुग्णाला खूप उशिरा उपचार मिळतात, यादरम्यान त्या रुग्णाचे व कुटुंबीयांचे अतोनात हाल झालेले असतात़ वैद्यकीयशास्त्रात प्रगती झाली असली वा उपचारपद्धती उपलब्ध असल्या तरी केवळ रुग्णांना व कुटुंबीयांना या आजाराची लक्षणे ओळखता येत नाहीत तसेच उपचारांची माहिती नसल्यामुळे आणि सामाजिक कलंकपणाच्या भावनेमुळे रुग्णांची हेळसांड वर्षानुवर्षे सुरूच आहे. या आजारातील रुग्णांचे विदारक चित्र बदलण्यासाठी स्क्रिझोफेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) गत वीस वर्षांपासून जनजागृतीचे कार्य करीत आहे.  मानसिक आजाराचे स्वरुप वरकरणी कळत नाही, त्यामुळे रुग्ण व नातेवाईक गोंधळून जातात. त्यातच त्यांना भलभलते सल्लेही दिले जातात. बुवाबाजी केली जाते. रुग्णाला इच्छाशक्तीच नाही असे गैरसमज नातेवाइकांच्या बाबतीत घडतात. मनोविकार हा शारीरिक आजाराचाच एक भाग आहे असे वाटणाऱ्यांची संख्या तुरळक असते.  गैरसमजामुळे बºयाचदा वेळेचा अपव्यय होतो व रुग्ण उपचारांपासून लांब राहतो़ वास्तविक मानसिक आजार हा मेंदूचा आजार म्हणजे शारीरिक आजारच आहे; परंतु आजही मानसिक आजाराकडे समाजात कमीपणाच्या भावनेने बघितले जाते. मानसिक आजारांमुळे त्या व्यक्तीची व कुटुंबाची अवहेलना होण्याची शक्यता असते. कुटुंबाला लाज वाटेल अशी गोष्ट झालेली आहे अशा दृष्टीने बघितले जाते.  रुग्णात इच्छाशक्तीचा अभाव आहे, रुग्ण केव्हाही हिंसक होऊ शकतो, मनोविकार पूर्णपणे आनुवंशिक आहेत, रुग्णापासून कायम लांबच राहिले पाहिजे असे विविध प्रकारचे गैरसमजदेखील समाजात  आढळून येतात. त्यामुळे मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय एकटे पडतात. त्यांना समाजाकडून आवश्यक असणारा आधार अत्यंत महत्त्वाच्या वेळी दुरावला जातो.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर