शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसाठी सुमारे २५ लाख मतदार

By admin | Updated: January 24, 2017 01:28 IST

जिल्हा परिषदेसाठी सुमारे २५ लाख मतदार

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत २४ लाख २३ हजार २३७ मतदारांची अंतिम यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. सर्वाधिक मतदार निफाड तालुक्यात असून, पेठ तालुक्यात सर्वांत कमी मतदारांची संख्या आहे.  जिल्हा परिषदेच्या ७३ व पंचायत समितींच्या १४६ जागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. ५ जानेवारी २०१७ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारूप यादी तयार केली होती. या यादीतून १२ जानेवारीला मतदारांची प्रारूप यादी जाहीर केली होती. या यादीवर प्रशासनाने हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने हरकतींची दखल घेऊन त्यांची सुनावणी प्रक्रिया घेत आक्षेपार्ह प्रारूप मतदार यादीतून वगळले आहे. जिल्हा प्रशासनाने २१ जानेवारीला या निवडणुकीसाठी अंतिम मतदार  यादी जाहीर केली. १५ तालुक्यातील  गट व गणनिहाय ही यादी जाहीर करण्यात आली आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक १० गण असून, यासाठी तीन लाख २८ हजार ५६२ इतके मतदार आहेत. तर पेठ तालुक्यात केवळ दोन गट असून,  यातील मतदारांची संख्या ही ७३ हजार ३५ इतकी आहे. अंतिम मतदार यादीतील सर्वच मतदार जिल्हा परिषदेच्या ७३ व पंचायत समितींच्या १४६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अंतिम मतदार यादी त्या त्या तहसील कार्यालयात तथा उपविभागीय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांत प्रसिद्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय मतदारबागलाण- २ लाख ३३ हजार ३५३, मालेगाव- २ लाख ७१ हजार ४६८, देवळा- ९४ हजार ८१५, कळवण- १ लाख १७ हजार ९८७, सुरगाणा- १ लाख १४ हजार ३५४, पेठ- ७३ हजार ३५, दिंडोरी- १ लाख ९३ हजार २३१, चांदवड- १ लाख ४३ हजार ७१४, नांदगाव- १ लाख ३० हजार ९८१, येवला- १ लाख ५० हजार ६०४, निफाड- ३ लाख २८ हजार ५६२, नाशिक- १ लाख २६ हजार ७५७, त्र्यंबकेश्वर- ९६ हजार ८४, इगतपुरी- १ लाख ५० हजार ६७२ व सिन्नर- १ लाख ९७ हजार ६२०.