शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:23 IST

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असताना या सुनावणीमध्ये नेमके काय आढळत आहे याची कोणतीही माहिती समोर येत नसल्याने दोषी शिक्षकांना अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देअहवाल गुलदस्त्यात : कुणावरही कारवाई नाहीखोटी माहिती भरूनही पदस्थापना काय

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असताना या सुनावणीमध्ये नेमके काय आढळत आहे याची कोणतीही माहिती समोर येत नसल्याने दोषी शिक्षकांना अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.अखेरच्या रॅण्डम राउंडमध्ये अवघड क्षेत्रात बदली झाल्याने या शिक्षकांनी न्यायासाठी जिल्हा परिषदेपासून, विभागीय आयुक्त तसेच न्यायालयाचेदेखील दरवाजे ठोठावले आहेत. जिल्हा परिषदेला सर्व प्रकारच पुरावे देऊनही जिल्हा परिषदेने नेमकी कशी तपासणी केली आणि कागदपत्रांची सतत्या कशी तपासून पाहिली याची माहितीच समोर येत नसल्याने ही संपूर्ण यंत्रणा चुकीच्या शिक्षकांना अभय देण्याच्या मानसिकतेत असल्याचा संशय आहे.गेल्या २० तारखेपासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्ष संबंधित शिक्षकांनादेखील बाजू मांडण्यास सांगितले जात आहे. मात्र हा चौकशीचा निव्वळ फार्स असून, अनेक शिक्षकांची कागदपत्रे बनावट आढळली असूनही असे किती शिक्षक जिल्हा परिषदेच्या रडारवर आहेत याची माहिती मात्र दिली जात नाही.ग्रामसेवक असो की अंगणवाडीसेविका, अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणे असो की चुकीची माहिती दिल्याने ग्रामसेवकाचे निलंब, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राधान्याने याची माहिती माध्यमांपर्यंत पोहचवित असतात. परंतु चुकीच्या बदल्या पदरात पाडून घेताना शासानची दिशाभूल करणाºया संबंधित शिक्षकांवरील कारवाईबाबत कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूणच चौकशी प्रकरणावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेने दि.२०तारखेपर्यंत संशयास्पद शिक्षकांची चौकशी, सुनावणी करून त्यांच्यावर कारवाई, नवीन पदस्थापना आणि अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिलेले आहेत. मात्र दि.२६ तारीख उलटूनही जिल्हा परिषदेकडून अद्याप दोषी शिक्षकांबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.न्यायालयावरच आता शिक्षकांची भिस्तजिल्हा परिषदेकडून न्यायाची अपेक्षा नसल्याने अन्यायग्रस्त शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या मंगळवारी होणार असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वच शिक्षकांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण बदलीप्रक्रिया ही सदोष असल्याने आॅनलाइन मधील दुरुस्तीसह संपूर्ण प्रक्रियाच नव्याने राबविण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली असल्याने सुनावणीकडे लक्ष लागून आहे.