नाशिक- येथील अभिजीत दिघावकर यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीने जागतिक युवा राजदूतपदी निवड केली आहे.अभिजीत यांनी जाणीव स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली असुन संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, युवक विकास क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. आंतरराष्ट्रीय युवक समिती ने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जागतिक युवा राजदूत म्हणुन निवड केली आहे. याआधी त्यांना महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कारही मिळाला असुन त्यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक युवा परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तसेच त्यांची नेपाळच्या युवा परिषदेनेही युवा राजदूत म्हणुन निवड केली आहे. अभिजीत सध्या आशियाई युवा संशोधन समिती चे सहयोगी सदस्य असुन इतरही विविध आंतरराष्ट्रीय संस्थाचे ते सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे २०३० पर्यंत एकुण १७ विभागात आणि स्तरात शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवक समिती युवकांना प्रोत्साहीत करण्याचे कार्य करणार आहे.
नाशिकच्या अभिजीतची जागतिक युवा राजदूतपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 17:02 IST
अभिजीत सध्या आशियाई युवा संशोधन समिती चे सहयोगी सदस्य असुन इतरही विविध आंतरराष्ट्रीय संस्थाचे ते सदस्य आहेत
नाशिकच्या अभिजीतची जागतिक युवा राजदूतपदी निवड
ठळक मुद्देअभिजीत सध्या आशियाई युवा संशोधन समिती चे सहयोगी सदस्य असुन इतरही विविध आंतरराष्ट्रीय संस्थाचे ते सदस्य आहेत