नाशिक : म्हाडा वसाहतीतील थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मासिक हप्ता थकबाकीचा भरणा जे गाळेधारक ३० नोव्हेंबर पूर्वी करतील, त्यांना थकबाकीच्या विलंब आकारावर ६० टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन म्हाडाच्या मुख्याधिकारी सरिता नरके यांनी केले आहे.
‘म्हाडा’च्या वतीने अभय योजना
By admin | Updated: November 16, 2014 01:19 IST