नाशिक : अवैध धंद्याची माहिती देणाऱ्या उपनगरमधील युवकाचे तिघा संशयितांनी कारमधून अपहरण केल्यानंतर त्यास बेदम मारहाण, तसेच त्याच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना गुरुवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ उपनगर पोलीस ठाण्यात अपहृत युवक रोशन अशोक जगताप (२२, रा. प्रगतीपार्क, साईमाउली, उत्तरानगर, उपनगर) याच्या फिर्यादीनुसार गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो आपल्या घरात बसलेला असताना संशयित गणेश शेलार हा गण्या व नित्या (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे तिघे घरात घुसले़ संशयित शेलार म्हणाला की, तू माझ्या अवैध धंद्याबाबत पोलिसांना माहिती दिल्यामुळेच त्यांनी छापा टाकला व त्यात माझे मोठे नुकसान झाले़ यानंतर या तिघांनी जगतापला इनोव्हा गाडीत बसवून चांभार लेणीच्या पायथ्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेत नेले.
उपनगरमधील युवकाचे खंडणीसाठी अपहरण
By admin | Updated: August 14, 2016 01:56 IST