शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

औंदाणे ग्रामपंचायतीत बोगस लाभार्थींना गाळे

By admin | Updated: May 17, 2017 00:13 IST

गैरव्यवहार : माहिती अधिकारात उघड झाला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : औंदाणे येथील ग्रामपंचायतीने जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार खैरनार यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला. शहरालगतच असलेल्या औंदाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या यशवंतनगर येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत सन २०१०-११ मध्ये व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. गाळे वाटप करताना लाभार्थींची निवड बांधकामाचा प्रस्ताव विचाराधीन असतानाच झालेली असते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने गाळे वाटप करताना जी कारणे कागदोपत्री दाखविली आहेत त्यापैकी कोणताही लाभार्थी या गाळ्यांमध्ये स्वत: व्यवसाय करताना दिसत नसून त्याने भाडेतत्त्वावर हे गाळे दुसऱ्या व्यावसायिकांना चालविण्यास दिले आहेत. ग्रामपंचायतीला मात्र नाममात्र भाडे दिले जाते. दि. ३१ मे २००९ व २ आॅक्टोबर २०१० च्या ग्रामसभांमध्ये अनुक्र मे ९४ व ४५ ग्रामस्थांची उपस्थिती होती. या सभांना गणपूर्तीचा अभाव असतानादेखील ग्रामपंचायत प्रशासनाने गाळे बांधकामाचा ठराव करताना गरजू व अपंग व्यक्तींना व्यवसायासाठी गाळे बांधण्याच्या ठरावाला मंजुरी दिली.औंदाणे येथील तत्कालीन सरपंच कैलास निकम, ग्रामसेवक नारायण पवार यांच्या काळातील हा प्रकार आहे. जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत यशवंतनगर येथे गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. या योजनेचा प्रस्ताव सादर करतानाच शोभा प्रकाश निकम, भारताबाई भिका पवार, संजय पांडुरंग खैरनार, लक्ष्मण गणेश गोसावी, आशा वसंत पंडित, सुरेश शंभूसिंग जोहरी, श्याम रामदास वडगे यांना वैयक्तिक व्यवसायासाठी व अम्मा भगवान महिला बचतगट, यशवंत महिला बचतगट, सप्तशृंगी महिला बचतगट यांना कागदोपत्री गाळे वितरित करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात या लाभार्थींनी जादा भाडेपट्ट्याने दुसऱ्या व्यावसायिकांना गाळे दिले आहेत. ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसानगैरप्रकारामुळे ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच नव्याने गाळे वाटप करून ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करावी, अशी मागणी खैरनार यांनी केली आहे.