शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

साडेसात हजार बॅँक खात्यांसाठी आता ‘आधार’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:08 IST

नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या ४६४ खातेदारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकर्जमुक्ती योजना : जिल्हा बॅँकेची ४६४ खाती; बहुतांश वयोवृद्ध खातेदार

नाशिक : दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्णातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या ४६४ खातेदारांचा समावेश आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत पीक कर्ज आहे अशा शेतकºयांच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होणार आहेत.सदर योजना आधार लिंक असल्याने ज्या कर्जदार शेतकºयांचे बॅँक खाते कर्ज खात्याशी लिंक आहे अशा शेतकºयांना लाभ मिळण्यास कोणतीही अडचण नाही. आधार लिंक नसल्याने या योजनेपासून दोन लाखांपर्यंतचे कर्जदार शेतकरी वंचित राहू नये यासाठी शासनाने बॅँक खात्याशी आधार जोडणी न केलेल्या शेतकºयांची यादी जाहीर करण्याचे आणि त्यांचे खाते आधाराशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अशा शेतकºयांची यादी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्णात ७६७६ शेतकºयांची खाते आधार लिंक करण्याचे काम महसूल आणि कृषी विभागाला करावे लागणार आहे. जिल्ह्णातील सुमारे दीड लाख खातेदारांना या योजनेचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेला एकही कर्जदार शेतकरी वंचित राहणार नाही.जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील सुमारे १ लाख २३ हजार खातेदार असून, त्यापैकी ४६४ खातेदार आधार संलग्न नाहीत त्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या खातेधारकांना तालुक्यातील आधार केंद्रांवर घेऊन जात त्यांचे आधार अपडेशन आणि लिंक करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. जे खातेदार शेतकरी घराबाहेर पडू शकत नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आधार लिंक आणि अपडेशन केले जाणार आहे. बॅँक खात्याशी आधार जोडणी केलेले असले तरी त्यांचे ‘थमइंप्रेशन’ जुळत नसल्याने त्यांच्या आधाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काहींनी अद्यापही आधारजोडणी केलीच नसल्याचीदेखील प्रकरणे आहेत.शेतकºयांनी केवळ जिल्हा बॅँकेतूनच नव्हे तर राष्टÑीयीकृत बॅँकांकडूनही पीककर्ज घेतलेले आहे. पीककर्ज देणाºया सुमारे ३० राष्टÑीयीकृत बॅँकांकडील ७२१२ आणि जिल्हा बॅँकेकडील ४६४ असे एकूण ७६७६ खाते आधारसंलग्न नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा यंत्रणा सज्जबॅँक खात्यांची आधार जोडणी नसलेल्या शेतकरी खातेधारकांची माहिती समोर आल्यानंतर अशा खातेधारकांचे आधार संलग्नता करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनावर शासनाने जबाबदारी सोपविलेली आहे. यासंदर्भातील गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला होता. शेतकºयांना आधार केंद्रावर आणून त्यांचे अपडेशन केले जाणार आहे. प्रसंगी शेतकºयांच्या घरी जाऊनही आधार अद्ययावत केले जाणार आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा नाही अशा ठिकाणी आधार प्रमाणिकरणासाठी इंटरनेटची आवयकता आहे. अशा गावातील शेतकºयांना नजीकच्या गावात नेऊन तेथील आपले सरकार केंद्रावर आधार प्रमाणिकरण आणि अन्य बाबी पूर्ण केल्या जातील. प्रसंगी अशा शेतकºयांसाठी वाहनांचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधार नसलेली खातीतालुका जोडणी नसलेली खातीनाशिक ००मालेगाव १७चांदवड ५९देवळा ०३सटाणा ०५कळवण ८६दिंडोरी ०४पेठ १२सुरगाणा ००इगतपुरी ५६त्र्यंबक ०४सिन्नर ३१नांदगाव ३०निफाड ७१येवला ८६

टॅग्स :Governmentसरकारbankबँक