चौकट-
जिल्हा बँकेकडून अन्याय
खरीप कर्ज वाटप करताना जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे. जे शेतकरी पात्र आहेत त्यांना शंभर टक्के कर्ज पुरवठा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. काही सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जास पात्र असले तरी बँकेकडून त्यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना कर्ज दिले जात असल्याची चर्चा जिल्हाभरात होत आहे.
चौकट-
मागील वर्षी कर्ज घेतले नाही...
मागील वर्षी कर्ज घेतलेले नाही म्हणूनही जिल्हा बँकेने काही शेतकऱ्यांना यावर्षी कर्ज नाकारले असल्याचे समोर येत आहे. हा या शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गंभीर आर्थिक स्थितीमुळे मागील चार पाच वर्षांपासून जर बँकेने कर्जपुरवठाच केला नाही तर सभासदांनी कर्ज उचलण्याचा प्रश्नच येत नाही, असा प्रश्न काही सोसायट्यांनी उपस्थित केला आहे.