शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

सिंहस्थ कामांवर ९७१ कोटी खर्च

By admin | Updated: June 12, 2016 23:38 IST

महापालिका : शासनाकडे ६८ कोटी रुपये अनुदान शिल्लक

 नाशिक : महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत विविध कामांसाठी मंजूर आराखड्यातील एकूण १११९ कोटी रुपयांपैकी ९७०.९२ कोटी रुपये खर्च केले असून, अद्याप शासनाकडून ६८.१३ कोटी रुपये येणे बाकी आहे. दरम्यान, महापालिकेने बचत केलेल्या निधीचा वापर नवीन कामांसाठी करण्याची परवानगी शासनाकडे मागितली आहे.महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत विविध कामांसाठी १११९.२९ कोटी रुपयांचा आराखडा शासनाला सादर केला होता. शासनाने भूसंपादन वगळून भांडवली व महसुली कामांसाठी महापालिकेला ९१९.२९ कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली होती. दरम्यान, नागपूर अधिवेशनदरम्यान उच्चाधिकार समितीची बैठक होऊन मुख्यमंत्र्यांनी राज्य शासन ७५ टक्के हिस्सा उचलणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्य शासनाकडून मंजूर अनुदानाच्या ७५ टक्के म्हणजे ६८९.४६ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त होणे अपेक्षित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने भूसंपादनासह ९७०.९२ कोटी रुपये खर्च केले आहेत. भूसंपादनासाठी मनपाने २३४.७० कोटी रुपये स्वनिधी वापरला आहे. महापालिकेने आपला हिस्सा उभा करण्यासाठी कर्ज काढले होते. त्यासाठी शासनाने महापालिकेला २६० कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यासाठी मान्यता दिली होती. त्यातील ९५ कोटी रुपये कर्ज महापालिकेने उचलले आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता ११ आॅगस्टला होत असून त्याला अवघे दोन महिने उरले असताना अद्याप शासनाकडून सिंहस्थाचे पूर्ण अनुदान प्राप्त झालेले नाही. मंजूर अनुदानापैकी शासनाकडून मनपाला ६८.१३ कोटी रुपये येणे अपेक्षित आहे तर भूसंपादनाकरिता ५० कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यासाठी मंजुरी शासनस्तरावर प्रलंबित आहे. सदर अनुदान आणि बचत केलेले अनुदान यातून नवीन कामे घेण्याची परवानगी महापालिकेने शासनाकडे मागितली आहे. (प्रतिनिधी)