शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

९५ टक्के विद्यार्थ्यांनी नीट दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

नाशिक : वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नाशिकमधील २४ केंद्रांवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेला ...

नाशिक : वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नाशिकमधील २४ केंद्रांवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेला (नीट) तब्बल ९५ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थितीत राहत प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करीत परीक्षा दिली. तर चार ते पाच टक्के विद्यार्थी वेगवेगळ्या कारणांनी या परीक्षेला उपस्थित राहू शकले नाही. परीक्षार्थींमधील काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश करताना पावसाच्या हलक्या सरींचा सामना करावा लागला. तर काही विद्यार्थ्यांना कडक नियमांमुळे सोबत आणलेले साहित्य पुन्हा पालकांकडे अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी प्रवेशद्वारावरून माघारी फिरावे लागल्याचे चित्र दिसून आले.

नाशिक जिल्ह्यातील २४ केंद्रावर झालेल्या ‘नीट’ परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसह पालकांची पावसामुळे तारांबळ उडाली पाऊस सुरू असल्याने हॉल तिकीट व ओळखपत्रे जपण्यात विद्यार्थ्यांना अडचणींच सामना करावा लागला. नाशिकमधून सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी जवळपास ९० ते ९५ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. कोरोनामुळे एका वर्गात केवळ १२ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ते प्रतिबंधात्मक अंतर पाळले गेले. तत्पूर्वी सकाळी ११.३० वाजेपासून दुपारी १.३० पर्यंत विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पारदर्शक पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवण्यास परवानगी मिळाली. परंतु रंगीत बाटली परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तर विद्यार्थ्यांना आवश्यक मास्कही परीक्षा केंद्रावरच पुरविण्यात आले.

---नियमांची काटेकोर अंमलबजावणी

नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मागील वर्षी दिलेल्या काही सवलती यावर्षी रद्द करून विशिष्ट पेहराव व नियम घालून देण्यात आले होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टी पालकांकडे ठेवण्यासाठी काही विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारापासून पुन्हा परतावे लागले. काही विद्यार्थ्यांनी बेल्ट, रुमाल, पाकीट, पेन, पैसे, घड्याळ यासह इतर वस्तू परीक्षा केंद्राबाहेरच काढून न ठेवता परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पुन्हा त्या वस्तू ठेवण्यासाठी माघारी फिरावे लागले.

--

परीक्षार्थी, पालकांमुळे वाहतूक कोंडी

विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी तीन तास अगोदरपासूनच परीक्षा केंद्रावर टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची एकाच वेळी होणारी गर्दी नियंत्रित ठेवणे परीक्षा केंद्र संचालकांना शक्य झाले; मात्र परीक्षा संपल्यानंतर एकाच वेळी सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक रस्त्यावर आल्याने परीक्षा केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची कोडी झाल्याचे दिसून आले. यावेळी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे परीक्षार्थी व त्यांच्या पालकांसह अन्य वाहनचालकांनीही नाराजी व्यक्त केली.