शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

शहरातील ३०२ ठिकाणी ९४३ सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 01:03 IST

पोलीस आयुक्तालयात बैठक : महापालिका स्मार्ट सिटी समिती सदस्यांचीही उपस्थिती

नाशिक : शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे़ यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने सर्वेक्षणाचा अहवाल पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल व अधिकाऱ्यांच्या बैठकीत सोमवारी सादर केला़ यानुसार ३०२ ठिकाणी ९४३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता भासणार असून, यामध्ये महापालिकेने आपल्या विविध विभागांचा समावेश केल्यास कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे़सिंहस्थ पर्वणी कालावधीनंतर तात्पुरते लावलेले सीसीटीव्ही काढून घेण्यात आले़ दरम्यानच्या काळात गुन्हेगारी वाढल्याने कायमस्वरूपी सीसीटीव्हीसाठी पोलीस व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यास मान्यता दिली़ यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने पोलीस ठाणेनिहाय सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्याचा अहवाल सादर केला आहे़ या सीसीटीव्हींसाठी महापालिकेचेही सहकार्य मिळणार असून आयुक्तालयातील बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या स्मार्ट समितीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते़ यावेळी समितीने दिलेल्या डीपीआर (सूक्ष्म सर्वेक्षण अहवाल) अहवालावर व बदलांबाबत चर्चा करण्यात आली़ तर पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी व स्मार्ट सिटी समिती प्रतिनिधींची बैठक होणार आहे़ यानंतर पुढील प्रक्रिया वेगाने पार पडण्यासाठी हालचाल केली जाणार आहे़ पोलीस आयुक्तालयात झालेल्या या बैठकीत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, पोलीस उपआयुक्त, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, दत्तात्रय कराळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, राजू भुजबळ, विजय चव्हाण यांसह प्रत्येक पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)सीसीटीव्हीच्या संख्येत होणार वाढशहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार सुमारे ९४३ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ अर्थात ही ठिकाणे पोलिसांनी सुरक्षितता, वाहतूक या दृष्टिकोनातून निश्चित केली आहेत़ यामध्ये महापालिका आपली विविध विभागीय कार्यालये, उद्याने, कचरा डेपो, अग्निशमन केंद्र अशी महत्त्वाच्या ठिकाणांची भर घालू शकते़ त्यामुळे सीसीटीव्हींची बसविण्याची ठिकाणे व कॅमेऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते़आयुक्तालयासह प्रत्येक पोलीस ठाण्यात कंट्रोल रूमआयुक्तालयातील स्वतंत्र कंट्रोल रूमद्वारे शहरातील सर्व सीसीटीव्हीचे नियंत्रण हे केले जाणार आहे़ याबरोबरच आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहण्याची सोय असणार आहे़ या व्यतिरिक्त महापालिका व वाहतूक विभागातही अशी व्यवस्था असेल. शहर वाहतूक विभागाला शहरातील सिग्नल यंत्रणा व प्रमुख गर्दीचे रस्ते तर महापालिकेला त्यांच्याशी संबंधित विभागांमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची सोय असणार आहे़ याखेरीज सुसज्ज कॅमेरे असलेल्या तीन मोबाइल व्हॅनही असणार आहे़