शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

बाबासाहेबांच्या त्र्यंबकेश्वर भेटीची ९४ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 00:19 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ही संतांची भूमी आणि शैव-वैष्णव यांचे श्रद्धास्थान आहे. याच त्र्यंबकेश्वरला भारतीय राज्यघटना शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब ...

ठळक मुद्दे स्मृतींना उजाळा : स्मारक उभारण्याची आंबेडकरप्रेमींची मागणी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ही संतांची भूमी आणि शैव-वैष्णव यांचे श्रद्धास्थान आहे. याच त्र्यंबकेश्वरला भारतीय राज्यघटना शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श लाभला आहे. बाबासाहेबांनी १८ जानेवारी १९२८ रोजी त्र्यंबकेश्वरला भेट दिली होती. या भेटीला मंगळवारी (दि. १८) बरोबर ९४ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त या भेटीचे स्मरण त्र्यंबककरांकडून केले जाते. मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत निवृत्तीनाथांनी जेथे ८०० वर्षांपूर्वी संजीवन समाधी घेतली, त्याच ठिकाणी जातीय भेदाभेदाच्या अंधकारात खितपत पडलेल्या भारतीय समाजाला दिव्यदृष्टी दाखविण्यासाठी बाबासाहेब आले होते. १८ जानेवारी १९२८ रोजी संत निवृत्तीनाथांची यात्रा सुरू होती. दुपारच्या सुमारास संत निवृत्तीनाथ मंदिराच्या अगदी समोर संत चोखोबा मंदिर आहे. तेथील भूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र पावलांचा स्पर्श झाला आणि ती भूमी पावन झाली. आज त्या पावनस्मृती जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेबांना पाहण्यासाठी यावेळी गर्दी उसळली होती. बाबासाहेबांनी उभारलेल्या चळवळीसाठी आपण काही देणे-लागतो, ही भावना लोकांमध्ये जागृत झाली. ह्यबहिष्कृत भारतह्ण या वृत्तपत्रात याची नोंद आहे. त्यावेळी लोकांनी आठ आण्यापासून, १ रुपया, पंचवीस रुपये, पन्नास रुपये अशी मदत केली होती. एकूण २०३ रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी मदत गोळा झाली होती. या सभेसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे उपस्थित होते. यावेळेस ब्राह्मण व मराठी नेत्यांनी या सभेस उपस्थित राहून अनिष्ट रुढी, परंपरांना विरोध केला होता.कोनशिलेतून इतिहास जागृतया ऐतिहासिक घटनेला ९४ वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक भेटीच्या आठवणी आजही त्र्यंबकेश्वर वासीयांच्या दृष्टीने अभिमानस्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते सन २०२० मध्ये आंबेडकर पुतळ्याजवळ ऐतिहासिक कोनशिलेचे अनावरण केलेले आहे. या दिवसाची महती आणि माहिती येथे आलेल्या प्रत्येक माणसाला व्हावी या हेतूने संविधान विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या संकल्पनेतून ही कोनशिला उभारण्यात आलेली आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरBabasaheb Dhabekarबाबासाहेब धाबेकर