शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १२ ड साठी ३९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 23:25 IST

महानगरपालिकेच्या प्रभाग १२ ड च्या पोटनिवडणुकीत ३८.९९ टक्के मतदान झाले असून, मतदान शांततेत पार पडले. मतदारांच्या औदासीन्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली. मतदान केंद्र क्रमांक १८ वर सर्वाधिक ६२.८५, तर ३१ वर सर्वात कमी ५.५७ टक्के म्हणजे ७७२ पैकी अवघ्या ४३ मतदारांनी आपला हक्क बजावला.

ठळक मुद्देपोटनिवडणूक : मतदान शांततेत

मालेगाव मध्य : महानगरपालिकेच्या प्रभाग १२ ड च्या पोटनिवडणुकीत ३८.९९ टक्के मतदान झाले असून, मतदान शांततेत पार पडले. मतदारांच्या औदासीन्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली. मतदान केंद्र क्रमांक १८ वर सर्वाधिक ६२.८५, तर ३१ वर सर्वात कमी ५.५७ टक्के म्हणजे ७७२ पैकी अवघ्या ४३ मतदारांनी आपला हक्क बजावला.जनता दल गटनेते बुलंद एकबाल निहाल अहमद यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी आज सकाळी साडेसात ते साडेपाचदरम्यान मतदान घेण्यात आले. शहरातील सहा शाळांमधील मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. पाच उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही जनता दलाचे मोहंमद मुस्तकीम डिग्नीटी व काँग्रेसचे मोहंमद फारूख कुरैशी यांच्यात होती. दोन दिवसांपासून शहरात थंडीचा कमी असलेला जोर आज पुन्हा वाढल्याने सकाळपासून मतदान संथगतीने सुरू होते. दुपारी दोनपर्यंत अवघे १७ टक्के मतदान झाले होते. दुपारी अडीच वाजेनंतर महिला मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडल्याने दुपारनंतर काही ठिकाणी महिलांच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत भर पडली. उद्या सकाळी  ९ वाजता महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. आज पार पडलेल्या पोटनिवडणुकीतही मतदार याद्यांमधील घोळ समोर आला. अनेक मतदारांच्या नावामध्ये चुका, महिलांचे फोटो व पुरुषांचे नाव तर काही नावांसमोर फोटोच नसल्याने मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. त्यामुळेही मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे उमेदवारांकडून आरोप करण्यात आला. निवडणुकीदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.मतदारांनी दाखविला निरुत्साहप्रभाग क्र. १२ ड मध्ये १२ हजार १०६ महिला, तर १२ हजार ४०८ पुरुष असे २४ हजार ५१४ मतदार आहेत; मात्र मतदानाच्या दिवशी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ४ हजार ५७९ स्रियांनी तर चार हजार ९८० पुरुष असे केवळ ९ हजार ५५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का या प्रभागात घसरला.

टॅग्स :Electionनिवडणूक