पाथरे: सिन्नर तालुक्यातल्या पाथरे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून ९० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. मिरगाव रस्त्यावरील पाथरे बुद्रुक शिवारातील कारभारी दारकू सुडके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सुमारे ९० हजार रुपयांचा चारा विकत आणला होता. त्यासाठी त्यांनी येथील पतसंस्थेतून कर्ज घेतलेले आहे. रविवारी दुपारी वीजवाहक तारांच्या घर्षणातून चार्याच्या गंजीवर ठिणगी पडल्याने आग लागली. चार्याच्या गंजीला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकर्यांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तथापि, आगीचे प्रमाण मोठे असल्याने आग आटोक्यात येईपर्यंत चार्याची संपूर्ण गंजी जवळपास खाक झाली होती. आग विझविण्यासाठी दिनेश राशिनकर, गणेश शिंदे, शरद रहाटळ, रखमा शिंदे, सोमनाथ आदमने, किसन कारले, गणेश राशिनकर, शहाबुद्दीन सय्यद आदिंसह शेतकर्यांनी प्रयत्न केले. ऐन उन्हाळ्याच्या स्थितीत सर्वत्र चारा-पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असताना सुडके कुटुंबीयांनी कर्ज काढून घेतलेला चारा जळाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तलाठी के. एम. परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सुडके कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. (वार्ताहर) ’नाशिक : शहरात बांधकामे करताना रस्त्याच्या कडेला रेबिट मटेरियल किंवा दगडविटा असे बांधकामाचे साहित्य परस्पर टाकणार्यांना मनपाने तंबी दिली.
चार्याला आग लागून ९० हजारांचे नुकसान
By admin | Updated: May 13, 2014 00:04 IST