शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षात वाचविली ३९ कोटींची मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:13 IST

गेल्या वर्षभरात शहर व परिसरात घडलेल्या २२५ आगीच्या घटनांमध्ये सुमारे ७ कोटी २९ लाख ९८ हजारांची मालमत्ता जळून खाक झाली आहे, तर अग्निशमन दलाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवित ३९ कोटी ८४ लाख २६ हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन दल : मालेगावी २२५ आगींच्या घटना

मालेगाव : गेल्या वर्षभरात शहर व परिसरात घडलेल्या २२५ आगीच्या घटनांमध्ये सुमारे ७ कोटी २९ लाख ९८ हजारांची मालमत्ता जळून खाक झाली आहे, तर अग्निशमन दलाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवित ३९ कोटी ८४ लाख २६ हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे.वाढती झोडपट्टी, अरुंद रस्ते, अतिक्रमणे, अपुऱ्या सुविधा यावर मात करीत येथील अग्निशमन दलाच्या जवानांचा संघर्ष सुरू आहे. मालेगावच्या तीन अग्निशमन दल केंद्रात ३० जवान कार्यरत आहेत, तर ७ बंब सज्ज आहेत. अतिक्रमण झाल्यामुळे शहरातील झोपडपट्टी भागातील रस्ते तीन ते चार फुटांचे आहेत. या भागात आगीची घटना घडल्यास या भागात बंब पोहोचणे अवघड होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना काहीवेळा पाचशे फुटांवरून पाण्याचा मारा करावा लागतो. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या वर्षभराच्या कालावधीत २२५ आगीच्या घटना घडल्या आहेत. बचाव कार्य करताना अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. मनपा आयुक्त किशोर बोर्डे, अग्निशमन दलप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी ३९ कोटी ६४ लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे. कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने कामात अनेक अडचणी येतात. सर्व अडचणींवर मात करत जवान आगीच्या घटना रोखत आहेत.२२ जणांचा मृत्यूपूर तसेच आगीच्या घटनेतून दोन व्यक्तींना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. यासह पाच जनांवरांना जीवदान मिळाले आहे. गेल्या वर्षी २२ व्यक्तींचा नैसर्गिक आपत्ती व आगीच्या घटनेत बळी गेला आहे. जवानांनी ३७ ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळविले.

टॅग्स :fireआग