शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी बांधण्यासाठी हवे नऊ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:50 IST

नाशिक : बांधकाम साहित्यांच्या वाढीव दरामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी निर्धारित असलेली सहा लाखांची मर्यादा वाढवून ती ९.१४ लक्ष करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती अर्पणा खोसेकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देअर्पणा खोसकर : महिला बालविकास मंत्र्यांकडे मागणी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली मागणी

नाशिक : बांधकाम साहित्यांच्या वाढीव दरामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी निर्धारित असलेली सहा लाखांची मर्यादा वाढवून ती ९.१४ लक्ष करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती अर्पणा खोसेकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.शासनाच्या निर्णयानुसार अंगवणवाडी केंद्र इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बिगर आदिवासी क्षेत्रात ६ लाख तर आदिवासी क्षेत्रात ६ लाख ६० हजारांचा खर्च करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र सद्यस्थितीत या रकमेत बांधकाम करणे शक्य नसल्याचा अभिप्राय बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने रक्कम वाढवून देण्याची मागणी खोसकर यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्णात ४४७६ अंगणवाडी केंद्रे व ५०६ मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यापैकी आदिवासी भागातील २६९७ व बिगर आदिवासी क्षेत्रातील २५८५ अंगणवाडी केंद्रे असून, २६३ अंगणवाडी केंद्रांना शासकीय स्वतंत्र इमारती नसल्याने सदरची अंगणवाडी केंद्रे खासगी जागेत आहेत. काही अंगणवाड्या या ग्रामपंचायत कार्यालयात, प्राथमिक शाळेत, समाजमंदिरात, वाचनालयात भरतात.याबरोबरच सध्या वाळू, सीमेंट, विटा या साहित्यांच्या दरामध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच जीएसटी वाढीमुळे अंगणवाडी बांधकामे ६ लाखात होत नसल्याने ही मर्यादा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकानुसार एक अंगणवाडी केंद्र इमारत बांधण्यासाठी किमान ९.१४ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार वित्तीय मर्यादेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी खोसकर यांनी नोंदविली आहे.