शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

९ महिन्यात ९ लाखांचा दंड वसूल, १३०० किलो प्लास्टिक जप्त

By suyog.joshi | Updated: October 18, 2023 14:16 IST

मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाची कडक कारवाई

नाशिक (सुयोग जोशी) : ऐन सणासुदीच्या पाश्र्भूमीवर प्लास्टिक विक्रेत्यांविरोधात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कडक पावले उचलली असून गेल्या ९ महिन्यात सहा विभागांमध्ये सुमारे ९ लाख रुपयांचा दंड वसूल केला असून १३०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.

शहरात वाढत्या प्लास्टिक वस्तूंच्या वापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत असून शहरात घनकचऱ्याची समस्या वाढल्याने महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासंदर्भात कठोर पावले उचलली आहेत. प्लास्टिकसारख्या अविघटनशील कचऱ्यामुळे मानवी तसेच निसर्गावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता महापालिका क्षेत्रात पुर्णत: प्लास्टिक बंदी केल्यानंतरही त्याचा सर्रास वापर होत आहे.

विशेष म्हणजे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून गेल्या ९ महिन्यांमध्ये १३०० किलो प्लास्टिक जप्त करून ९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अस्वच्छता करणारे नागरिक आणि आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.अस्वच्छता करणाऱ्यांना दणका

शहरात स्वच्छता राखण्यासासाठी भाजी मार्केट, बाजारपेठ, शहरातील विविध चौक, फुटपाथ, गर्दीची ठिकाणे येथे मनपाची पथके लक्ष ठेऊन आहेत. अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसुल केला जात आहे. विलगीकरण न केलेला आणि वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा सोपवल्याबद्दल, नदी, नाले येथे अस्वच्छता करणारे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे, रस्ते मार्गावर अस्वच्छता करणे, पाळीव प्राण्यांमुळे रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, उघड्यावर लघुशंका करणे आदी संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.सध्या नवरात्रोत्सव, दसरा दिवाळी यासारखे सण उत्सव साजरे होणार आहेत. या काळात सिंगल युज प्लास्टिकचा वापर विक्रेत्यांकडून होऊ शकतो, मात्र ग्राहकांनी या संदर्भात काळजी घ्यावी. हातगाडीवाले, फुल व फळ विक्रेते, भाजीविक्रेते, विविध प्रकारच्या छोट्या - मोठ्या वस्तू रस्त्यालगत विकणाऱ्या दुकानदारांनी सिंगल युज प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा. नागरिकांनी, विक्रेत्यांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे.- डॉ. आवेश पलोड, संचालक मनपा घनकचरा व्यवस्थापन.