९६६ बॅरिकेट्सच्या सहाय्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. ही बॅरिकेट्स न तुटणारे व चांगल्या दर्जाचे तयार करून घेतले आहेत. गावातील चौकाचौकात, मोक्याच्या ठिकाणी, ठिकठिकाणी सीसीटीव्हीचे २०५ कॅमेरे गर्दी टिपणार आहे. संशयित बाबींचेही चित्रण करतील. तसेच वेळोवेळी सूचना देणे कामी गर्दीचे नियोजन करण्यासाठी, बेपत्ता झालेल्यांच्या सूचना नातेवाइकांना देणे यासाठी सुमारे ८४० भोंगे (स्पीकर्स) वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे क्षणार्धात नातेवाइकांना व चुकलेल्यांनादेखील दिलासा देण्याचे हे काम ध्वनिक्षेपकांद्वारे भोंग्यामार्फत होणार आहे. या सिंहस्थात आधुनिक यंत्रणेद्वारे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून नियंत्रण करता येईल. केवळ पोलीस बळावरच विसंबून न राहता पोलीस बंदोबस्ताला आधुनिक यंत्रणांची चांगली मदत होणार आहे. विशेष म्हणजे १३ सप्टेंबरला मुख्य पर्व असल्याने गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे.
९६६ बॅरिकेट्सच्या सहाय्याने गर्दीवर नियंत्रण
By admin | Updated: July 3, 2015 00:33 IST