शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

९४ टक्के निकाल :पदविका अभ्यासक्रमात ५५ परीक्षार्थी उत्तीर्ण उर्दू शिकण्याकडे बिगर उर्दू भाषिकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:10 IST

नाशिक : ‘शायरी की जान उर्दू जुबान...’ असे म्हटले जाते कारण उर्दूमधील गोडवा अन् नजाकत काहीशी हटकेच आहे. त्यामुळे उर्दूचे नेहमीच सर्वांना आकर्षण राहिले आहे.

ठळक मुद्देबिगर उर्दू भाषिकांचा टक्का अधिक अभ्यासक्रमाची १३वी बॅच सध्या सुरू

नाशिक : ‘शायरी की जान उर्दू जुबान...’ असे म्हटले जाते कारण उर्दूमधील गोडवा अन् नजाकत काहीशी हटकेच आहे. त्यामुळे उर्दूचे नेहमीच सर्वांना आकर्षण राहिले आहे. भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्या भाषेची ओळख सर्वप्रथम गरजेची असते. मागील बारा वर्षांपासून शहरात उर्दू भाषेचा पदविका अभ्यासक्रम सुरू असून, यामध्ये बिगर उर्दू भाषिकांचा टक्का अधिक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेत ५८ विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये २३ टक्के बिगर उर्दू भाषिकांचा समावेश आहे.उर्दू माध्यमाचे शिक्षण देणारी शहरातील सारडा सर्क ल येथील यूज नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये उर्दू पदविका अभ्यासक्रम बारा वर्षांपासून शिकविला जात आहे. एकूण शंभर प्रवेश अर्ज या अभ्यासक्रमाच्या एका बॅचसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा अभ्यासक्रम शिकणाºया बाराव्या बॅचचा निकाल नुकताच जाहीर झाला. या बॅचमध्ये १०० विद्यार्थी होते; मात्र त्यापैकी ५८ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले व त्यामधून ५५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे. या अभ्यासक्रमाची १३वी बॅच सध्या सुरू असून, यामध्येही १०० विद्यार्थी उर्दूचे धडे गिरवित आहे. चौदाव्या बॅचची प्रवेशप्रक्रियाही पूर्ण झाली असून, १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये ५४ विद्यार्थी बिगर उर्दू भाषिक आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांनी दिली. बारा वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत उर्दू पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. एक तपापासून अभ्यासक्रम अखंडितपणे चालविला जात आहे. सुरुवातीला काही बॅचमध्ये प्रवेशसंख्या कमी होती; मात्र या अभ्यासक्रमाचा प्रचार-प्रसार होताच प्रवेशसंख्या वाढली आहे.