शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्राथमिक शाळांच्या ८८१ वर्गखोल्या पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:27 IST

नाशिक : गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१ ...

नाशिक : गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या असल्या तरी, काही खोल्या पाडण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी नसल्याने त्या तशाच असून, ज्या ठिकाणी खोल्या पाडण्यात आल्या, तेथील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे सर्वप्रथम पसरविण्यात आले. त्यासाठी काही गावांमध्ये ग्रामस्थांनीच पुढाकार घेत शाळांसाठी जागा व लोकवर्गणीतून खोल्यांचे बांधकाम तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी करून दिले आहे. त्यानंतर शासनाकडूनही ज्ञानाची गंगा आणखी बळकट करण्यासाठी शाळा खोल्यांचे बांधकाम करून देण्यात आले. अशा शाळांमधून आजवर हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. मात्र, आता देखभाल व दुरूस्तीअभावी खोल्यांची परवडच होत आली आहे. शासनाकडून अन्य शैक्षणिक बाबींवर वारेमाप खर्च केला जातो. मात्र, शाळांची दुरूस्ती वा नवीन शाळांच्या बांधकामाबाबत हात अखडता घेतला जात असल्याने वर्षानुवर्षे वादळी वारा, तडाख्याच्या पावसाचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील शाळांची दुरवस्था कायम आहे. अनेक शाळांची पडझड झाल्याने अशा वर्गांमध्ये विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याकडून धोकादायक वर्गखोल्यांची माहिती मागविली असता २९६ प्राथमिक शाळांच्या सुमारे ८८१ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार त्या निर्लेखीत करण्यात येणार आहेत. या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, पाडण्यासाठी येणाऱ्या खर्चाची कोणतीही तजवीज शिक्षण विभागाकडून केली जात नसल्याने धोकादायक वर्गखोल्या जैसे थे आहेत. सध्या शाळा बंद असल्याने तूर्त या वर्गखोल्या पाडण्याची शिक्षण विभागाला घाई नसली तरी, पावसाळ्यात या शाळा कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अलिकडेच वर्गखोल्या पाडताना त्यासाठी लागणाऱ्या निधीचीही तरतूद करण्याचा ठराव जिल्हा परिषदेने केला आहे.

चौकट=

तालुकानिहाय शाळा व पाडण्यात येणाऱ्या वर्गखोल्या

* बागलाण- ३२ (९१)

* चांदवड- २३ (८७)

* देवळा- १९ (१३)

* दिंडोरी- १९ (६५)

* इगतपुरी- २७ (८३)

* कळवण- ३२ (६६)

* मालेगाव- (१९ (८९)

* नांदगाव- १५ (४७)

* नाशिक- १२ (३२)

* निफाड- १८ (५५)

* पेठ- १२ (२२)

* सिन्नर-२४ (७८)

* त्र्यंबक- ५ (१०)

* सुरगाणा- २७ (४५)

अन्य (३५)