शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणात ८८ टक्के जलसाठा; रात्री आठ वाजता ७५००क्युसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 20:37 IST

 त्र्यंबकेश्वर तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सातत्याने दिवसभर कायम होता. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९१ मि.मि इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.

ठळक मुद्देगंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अधिक रात्री ८ आठ वाजता एक हजार क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आल्याने ७५०० क्युसेक पाणी नदीपात्रात त्र्यंबकेश्वर तालुक्यात संध्याकाळपर्यंत ९१ मि.मि. इतका पाऊस. गंगापूर धरणात पाच हजार ६३० दलघफू इतका जलसाठा धरण ८८ टक्के भरले आहे.

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सातत्याने दिवसभर कायम होता. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९१ मि.मि इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. यामुळे गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अधिक असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत होती. त्यामुळे सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेल्या विसर्गामध्ये रात्री ८ वाजेपर्यंत वाढ कायम होती. आठ वाजता एक हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने ७५०० क्युसेक पाणी नदीपात्रात प्रवाहित होते. गंगापूर धरणात पाच हजार ६३० दलघफू इतका जलसाठा असून धरण ८८ टक्के भरले आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ग्रामिण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये विश्रांतीनंतर पावसाची विक्रमी नोंद झाली असून त्र्यंबकेश्वर तालुक्यात संध्याकाळपर्यंत ९१ मि.मि. इतका पाऊस झाला.

एकूणच धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे गंगापूर धरणसमुहातील गौतमी, काश्यपी, आळंदी या धरणांसह मुख्य गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. सकाळी अकरा वाजेपासून विसर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली. प्रारंभी एक हजार क्युसेक त्यानंतर दोन तासांनी दोन हजार क्युसेक आणि दुपारी दोन वाजता ४६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात धरणातून सध्या ४६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठालगत रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सुरू झालेल्या विसर्गामुळे नदीचा जलस्तर वाढला आहे. रामकुंडावरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून सुमारे पाच हजार क्युसेक पाणी पुढे रामकुंडामध्ये प्रवाहीत होते. यामुळे गोदावरीवरील लहान पुल, लहान मंदिरे पाण्याखाली गेली. गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्याने सोमेश्वर मंदिराजवळील दुधसागर धबधबा खळाळला आहे. रविवारची सुटी असल्यामुळे नाशिककरांनी विशेषत: तरुणाईने धबधबा परिसरात गर्दी केली होती.