शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:54 IST

इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदानप्रक्रि या शांततेत पार पडली. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम जाणवला.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदानप्रक्रि या शांततेत पार पडली. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम जाणवला. सायंकाळपर्यंत सुमारे ८३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. अखेरच्या वेळेपर्यंत हक्काचे मतदान करवून घेण्यासाठी उमेदवारांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते.मतदानासाठी मतदारांनी बाहेर पडावे यासाठी चारचाकी वाहनांची खास व्यवस्था करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. २७ ग्रामपंचायती ंमध्ये प्रत्यक्षात मतदान प्रक्रि या पार पडली. दुपारच्या उन्हात मतदान करणे अवघड होईल याचा अंदाज असल्याने मतदारांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली होती. गावातील अनेक मतदार उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी गेलेले आहेत. अशा मतदारांना शोधण्यात उमेदवारांच्या समर्थकांनी कोणतीही कसर सोडली नाही. मतदानाच्या दिवशी दिवसभर अनेक घडामोडी घडत असल्यातरी या संदर्भात कोणत्याही तक्र ारी आल्या नाही. मतदारांनी शांततेत मतदान केल्याने इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी आभार व्यक्त केले. तालुक्यातील ७७ केंद्रावर जवळपास ४६० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाची जबाबदारी पार पाडली. मतदान प्रक्रि या शांततेत पार पडावी यासाठी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, घोटीचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, वाडीवºहेचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शन ाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मतदानावेळी काही केंद्रांवर उमेदवारांनी काही मुद्द्यांवर आक्षेपही घेतले. काही कारणांवरून किरकोळ वादही उद्भवले. दुपारच्या वेळी मतदान प्रक्रि या संथपणे सुरू होती. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदार घराबाहेर पडू लागल्याचे पहावयास मिळाले.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत