शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

नगरपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान

By admin | Updated: November 1, 2015 22:41 IST

उत्साह : सकाळपासूनच मतदारांच्या रांगा; चोख पोलीस बंदोबस्त

नाशिक : जिल्ह्याातील कळवण, देवळा, चांदवड, पेठ, सुरगाणा व निफाड या सहा नगरपंचायतीसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मतदानादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. सोमवारी (दि. २) सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून, साधारणात: १२ वाजेपर्यत चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

चांदवड : चांदवड नगरपरिषदेसाठी १७ प्रभागांत १४२२५ मतदारांपैकी ११३९७ मतदारांनी मतदान केले. एकूण ८०.१२ टक्के मतदान झाले. प्रभाग निहाय झालेले मतदान  (१) ४१० पैकी ३०९. (२) ४२८ पैकी २९३, (३) ११५५ पैकी ९७३,(४) ९२५ पैकी ८००, (५) ६९२ पैकी ५९४, (६) १०९४ पैकी ८३८ , (७) ७३० पैकी ५५३, (८) १२११ पैकी ९०९, (९) ९४८ पैकी ७५८ ,(१०)८२७ पैकी ६८७, (११) ५३६ मतदानापैकी ४५१, (१२) ९०९ पैकी ७३५, (१३) १२०५ पैकी ९९५, (१४) ७८५ पैकी ६५०, (१५) १०२० पैकी ७८९, (१६) ९०० पैकी ६७१, (१७) ४५० पैकी ३९२ मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार मनोज देशमुख, अतिसहायक निवडणूक अधिकारी दिलीप मेनकर यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलीस निरीक्षक मधुकर वराडे, कैलास चौधरी व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. मतमोजणी चांदवडच्या प्रशासकीय इमारतीत होणार आहे. सुरगाणा : येथील नगर पंचायतसाठी १७ वार्डमधून ३७२० मतदाना पैकी २९१३ मतदान होऊन एकूण ७८.३० टक्के मतदान झाले.वार्डनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे. - (१)२१३ पैकी १५० (२) १४० पैकी ११२, (३) २७५ पैकी २२५, (४) २४२ पैकी २०४, (५) २९३ पैकी २४७, (६) १३१ पैकी ११६, (७) २५९ पैकी २१३, (८)२०९ पैकी १६६, (९) २०० पैकी १६८, (१०) २९१ पैकी २३९, (११)१७० पैकी १५३, (१२) २७३, पैकी २०६, (१३) १७१ पैकी १३०, (१४) १६२ पैकी ११७, (१५) २०८ पैकी ९०, (१६) ३२२ पैकी २५२ आणि (१७) १६०पैकी १३४ याप्रमाणे एकूण मतदान ७८.३० टक्के झाले. येथील तहसिल कार्यालयात मतमोजणी होणार असून १० वाजेपर्यंत निकाल अपेक्षति आहे. निफाड : नगरपंचायतीसाठी एकूण १३ हजार ७४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे ८१.१४ टक्के मतदानाची नोंद झाली ६६ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. येथील मार्केट यार्ड परिसरात सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांमध्येही उत्साह दिसून आला. येथेसकाळपासून मतदानासाठी मतदारांनी लाबंच लांब रांगा लावल्याचे चित्र होते. येथे एकून येथील एकूण १३ हजार ७४७ मतदारांपैकी ७ हजार ०३९ पुरुष तर ६ हजार ७०८ महिला मतदार असून यातील ५ हजार ७९९ पुरुष मतदारांनी व ५ हजार ३५५ महिला मतदारांनी रविवारी मतदान केले. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बसपा या सर्व पक्षांचे मिळून ५३ तर १३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ( वार्ताहर)पेठला ८०.२४ टक्के मतदान पेठ : पेठ नगरपंचायतीच्या निवडणुकीत ८०़२४ टक्के मतदान झाले. तीन हजार ९६७ मतदारांपैकी तीन हजार १८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला(१) १३२ पैकी ११४ , (२) १०५ पैकी ७३, (३) ३१४ पैकी २५१, (४) ३०७ पैकी २०४,(५) २४१ पैकी २००, (६) २९४ पैकी २५६(७) २८७ पैकी २३५, (८) २०१ पैकी १६२(९) १५४ पैकी १०९, (१०) १४१ पैकी १०७(११) २७२ पैकी २३०, (१२) १६६ पैकी १४५(१३) ३४५ पैकी ३०३, (१४) १८४ पैकी १५८(१५) २५३ पैकी १९६, (१६) ३४७ पैकी २४९(१७) २२४ पैकी १५५.कळवणला प्रभागनिहाय झालेले मतदान : प्रभाग क्र.२- ७५७ पैकी ६३८, प्रभाग ३- ८४५ पैकी ६३७, प्रभाग ४- ७९६ पैकी ६२२, प्रभाग ५- ८१७ पैकी ६७८ = (82 टक्के), प्रभाग ६- ६५२ पैकी ५१३, प्रभाग ७- ९१९ पैकी ७७१, प्रभाग ८- ७५४ पैकी ६२५, प्रभाग ९- ९१८ पैकी ६७७, प्रभाग १०- ८१५ पैकी ४६९, प्रभाग ११- ७६९ पैकी ६०८, प्रभाग १२- ८२५ पैकी ५७८, प्रभाग १३- ८३१ पैकी ६५२, प्रभाग १४- ६२८ पैकी ३५३, प्रभाग १५- ९१३ पैकी ७५३, प्रभाग १६- ९१२ पैकी ६९८, प्रभाग १७- ६९९ पैकी ४६७ मतदान झाले. येथे प्रभाग क्रमांक एकमध्ये बिनविरोध निवड झाली आहे.