शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

केमिकलमिश्रित पाणी पिल्याने सोनेवाडीत ८ मेंढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 00:01 IST

ओझर टाऊनशिप : येथून जवळच असलेल्या सोनेवाडी येथे नाल्यातून वाहत जाणारे केमिकलमिश्रित पाणी पिल्यामुळे आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, ३२ मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत.दरम्यान, या घटनेसंदर्भात ओझर पोलिसांत नोंद करण्यात आली असून, भरपाई मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त मेंढपाळाने केली आहे.

ठळक मुद्दे३२ अत्यवस्थ : घटनास्थळावरच उपचार सुरू

ओझर टाऊनशिप : येथून जवळच असलेल्या सोनेवाडी येथे नाल्यातून वाहत जाणारे केमिकलमिश्रित पाणी पिल्यामुळे आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, ३२ मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत.दरम्यान, या घटनेसंदर्भात ओझर पोलिसांत नोंद करण्यात आली असून, भरपाई मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त मेंढपाळाने केली आहे.ओझर गावातून तसेच परिसरातून तेलाचे रिकामे डब्बे आणून ते केमिकलने स्वच्छ करण्याचे व ते डबे पुन्हा तेल गिरण्यांना विक्री करण्याचा अनधिकृत व्यवसाय सोनेवाडी येथे सुरु आहे. हे डबे धुतल्यानंतर केमिकलचे पाणी नाल्यात वाहत जाते. याच परिसरात दत्तू पल्हाळ यांच्या मेंढ्या चरायला जात असतात. त्या मेंढ्यांनी तहान लागल्यावर नाल्यातील पाणी पिल्यामुळे ही दुर्घटना घडली. आठ मेंढ्यांचा तत्काळ मृत्यू झाला तर ३२ मेंढ्या अत्यवस्थ आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी वानखेडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या मेंढ्यांवर औषधोपचार केले. घटनेचे वृत्त समजताच तलाठी उल्हासराव देशमुख यांनी पंचनामा केला. तसेच पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन यासंदर्भात ओझर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. मेंढपाळ पल्हाळ यांनी मेंढ्या हेच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने आम्हाला भरपाई मिळावी, अशी मागणी केली. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी घटना स्थळी भेट देऊन सदर डबेवाल्याच्या व्यवसायास ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी दिलेली नसून व तशी नोंदही नाही. त्यामुळे या घटनेबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.अनधिकृत व्यवसायतेलाचे डबे केमिकलच्या पाण्याने स्वच्छ करण्याच्या या व्यवसायास ग्रामपालिकेने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेला नाही. ते वाहत जाणारे पाणी नाल्यात जात असल्यामुळे परिसरांत दुर्गंधी पसरत असल्याचे सोनेवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितले. संबंधितास सांगूनही त्याचा व्यवसाय थांबला नाही व विरोध करणाऱ्यांशीच तो हमरीतुमरी करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :sinnar-acसिन्नरCrime Newsगुन्हेगारी