शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

३६ लाखांच्या वाहनांसह ८ लाखांचे मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:23 IST

पेठ : गुजरातमधून महाराष्ट्रात अवैध मार्गाने तीन आलिशान वाहनांतून विविध कंपन्यांचा मद्यसाठा जप्त करण्यात येऊन दोन हजार ८५० मद्याच्या बाटल्यांची रात्री उशिरा मोजणी करण्यात आली. यामध्ये सात लाख ९५ हजार ४२८ रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.शुक्र वारी पेठ पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून तस्करांनी सोडून दिलेली वाहने ट्रॅक्टरला जोडून पोलीस ठाण्यात ...

ठळक मुद्देसात लाख ९५ हजार ४२८ रूपयाचा मुद्देमाल हस्तगत

पेठ : गुजरातमधून महाराष्ट्रात अवैध मार्गाने तीन आलिशान वाहनांतून विविध कंपन्यांचा मद्यसाठा जप्त करण्यात येऊन दोन हजार ८५० मद्याच्या बाटल्यांची रात्री उशिरा मोजणी करण्यात आली. यामध्ये सात लाख ९५ हजार ४२८ रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.शुक्र वारी पेठ पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून तस्करांनी सोडून दिलेली वाहने ट्रॅक्टरला जोडून पोलीस ठाण्यात आणली. मात्र दारु वर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग स्वतंत्रपणे निर्माण केलेला असतानाच ज्या ठिकाणी वादग्रस्त वाहनांची कोंडी करण्यात तेथुन करंजाळी येथील दिंडोरी उपविभागाचे अखत्यारीतील राज्य उत्पादन शुल्क विभागास याची खबरच नव्हती ? मात्र पोलीसांनी कळवुनही त्यातील कुणीही अधिकारी, कर्मचारी तिकडे फिरकलेच नाहीत . पेठ पोलीस ठाण्यात गुजरातमधून महाराष्ट्रात गाडयांमधून विदेशी दारु महाराष्ट्रात पेठ मार्गाने येणार असल्याची खबर प्राप्त झाली . मात्र ऐनवेळी मार्ग बदलून ओझरखेड , हरसुल ,कोहोर , करंजाळी मार्गाने वाहने घुसवि ण्यात आली . ही खबर मिळाल्याने करंजाळी येथे आठवडा बाजार असल्याने तस्कर गर्दीचा फायदा घेऊन पलायन करीत असल्याने पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी करंजाळी -कोहोर मार्गादरम्यान वाहनांची कोंडी करण्याचा निर्णय घेतला .त्यासाठी कौहार, भायगाव , लिंगवणे व परिसरातील पोलीस मित्रांच्या सहकार्याने दुपारी 4 वाजे दरम्यान करंजाळीच्या दिशेने येत असतांना आपण घेरले गेलो याची खात्री झाल्याने तस्कर वाहने लॉक करूण पळून जाण्यात यशस्वी झाली .या या धडक कारवाईची माहिती पोलीस अधिक्षक संजय दराडे , अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड व पोलीस उप अधिक्षक शामराव वळवी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी सहायक पोलीस निरिक्षक साळी , पोलीस हवालदार डंबाळे, जाधव .डिंगर , शेखरे पोलीस नाईक रहेरे , भुसनर, तुंगार पोकॉ . भोये पोलीस नाईकफलाने यांच्या पथकाने गेली कित्येक वर्षात अश्या प्रकारची धाडसी कारवाई केली.या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी . कायदा अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . मात्र या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे कठीण आव्हान पोलीस खात्यापुढे असुन नाशिकिस्थत काही राजकीय पदाधिकारी प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्नशील असल्याने विदेशी दारु ची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता दिसुन येते .वाहनांची तपासणी केली असता त्यात खच्चून विदेशी दारूच्या बाटल्या , खोके भरलेले आढळून आले . चालक वाहनांच्या चाव्या घेऊन गेलेले आढळून आल्याने परिसरातील ट्रॅक्टरला जोडून वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली . मालाचे वर्गीकरण करण्यात आले असता . त्यात दमन निर्मीत दारूच्या बाटल्या आढळून आल्या . त्याची बाजारभावाने किंमत सात लाख ९५ हजार ४२८ रु पये एवढी असून, ३६ लाखांच्या वाहनांसह ४३ लाख ९५ हजार ४२८ रु पयांचा माल जप्त करण्यात आला .