शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या ७८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By admin | Updated: October 31, 2015 00:02 IST

नोंदवही कार्यक्रम : प्राथमिक शिक्षकांना वगळले

नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कार्यक्रमासाठी महापालिकेने ७८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, घरपट्टी-पाणीपट्टी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या अतिरिक्त कामाबद्दल नाराजी दर्शवत वसुली कामकाजावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दैनंदिन कामकाज सांभाळून कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडावाच लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.सध्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कामासाठी महापालिकेने आपल्या आस्थापनेवरील ७८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, तर त्यातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले आहे. मात्र माध्यमिक शिक्षकांना सदर काम देण्यात आले आहे. दरम्यान, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या कामासाठी जुंपण्यात आल्याने पूर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, या अतिरिक्त कामामुळे घरपट्टी सूचनापत्र, पाणीबिल वाटप तसेच वसुलीच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होणार आहे. सदर अतिरिक्त कामकाज केवळ वसुली कर्मचाऱ्यांनाच देण्यात आले आहे. याचबरोबर सध्या पाणीकपातीची अंमलबजावणी सुरू असल्याने पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांऐवजी वसुली कर्मचाऱ्यांनाच मोटार जप्तीचे व दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कामावर ताण पडणार असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)