शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी २४ तासात ७७ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:49 IST

मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.

मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.मालेगाव शहरात ८ एप्रिलला पहिला रूग्ण सापडल्यानंतर शहराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. शहरात एका महिन्यातच रुग्णांचा आकडा ५०० च्या घरात जाऊन पोहोचला आहे. शुक्रवारी (दि.८) सकाळी २१, दुपारी १ तर सायंकाळी ६ याप्रमाणे एकूण २८ रुग्णांची वाढ झाली. यात २३ पुरुष तर ५ महिलांचा समावेश होता. महिला रुग्णांमध्ये एक दीड वर्षाच्या मुलीचा तर पुरुषांमध्ये २ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी (दि.९) आलेल्या अहवालात ४९ रुग्ण बाधित मिळून आले आहे. गेल्या २४ तासांत मालेगावात ७७ रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्ण संख्या ४९७ इतकी झाली आहे. यातील १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना स्वगृही पाठविण्यात आले. मालेगाव शहरासह तालुक्यातील रुग्णांमध्येदेखील वाढ होत असून, दाभाडी येथे ९, सवंदगाव १ तर चंदनपुरीत १ अशा ११ रुग्णांचा समावेश आहे.-----------------------------मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात द्या-भामरेमालेगाव : कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी मालेगाव मध्य मतदारसंघ सील करून लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी आपण केंद्र व राज्य सरकारकडे केली असल्याचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात भामरे यांनी मालेगाव बाह्यमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यास मालेगाव मध्यच जबाबदार असल्याचाही आरोप केला आहे.भामरे यांनी म्हटले आहे, मालेगाव मध्यमधील जनतेला कोरोनाचे गांभीर्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रशासन, पोलीस, डॉक्टर यांना सहकार्य होत नाही. अनेक वेळा पोलीस व डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. त्यासाठीच आपण गेल्या महिन्यापासून राज्य शासनाकडे मालेगाव मध्य सील करून लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी करीत आहोत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही दिले असून, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चादेखील झालेली आहे. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झालेली आहे. केंद्र सरकार मालेगाव मध्यमध्ये लष्कर पाठवायला तयार आहे, परंतु जोपर्यंत राज्य सरकार अधिकृत त्यासंदर्भात मागणी करीत नाही तोपर्यंत लष्कर पाठविता येत नाही. मालेगाव मध्यमधील लोक पोलीस प्रशासनाला दाद देत नाहीत, त्यामुळेच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात देण्याची गरज असल्याचेही डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. महिनाभरापूर्वीच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात दिले असते तर आज रुग्णांची वाढलेली संख्या दिसली नसती.

टॅग्स :Nashikनाशिक