शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

७५ हजार रोपांच्या लागवडीचा संकल्प

By admin | Updated: June 17, 2016 00:11 IST

त्र्यंबकेश्वर : वन विभागातर्फे जागतिक वनमहोत्सव साजरा होणार

 त्र्यंबकेश्वर : जागतिक वनमहोत्सव व महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात दोन कोटी रोपांच्या लागवडीचे तर त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात साधारणपणे ७५ हजार रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.त्र्यंबकेश्वर शहरात यापूर्वीच तीन हजार वृक्षांचे उद्दिष्ट सांगण्यात आले. त्यापैकी १५00 खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यासाठी वृक्ष संवर्धनाच्या जाळ्या (ट्री गार्ड) दानशूर व्यक्तींकडून करून घेण्यात येत आहेत. याकामी नगराध्यक्ष विजया लढ्ढा, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे व अन्य पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.वृक्षलागवडीची पूर्वतयारी त्र्यंबक नगरपालिकेने अगोदरपासूनच केली आहे, तर वन विभागातर्फे गणपतीबारी ते लग्नस्तंभापर्यंत २५ हजार रोपे, पहिणे घाटात २0 हजार, देवगाव परिसर २५ हजार, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट बिल्वतीर्थ परिसरात एक हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्र्यंबक नगरपालिकेला दोन हजार रोपे देण्यात येणार आहेत. गावातील दहा आखाडे, साधू-महंतांचे आश्रम याठिकाणी एक हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील कृषी विभाग आदिंसह विविध शासकीय कार्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वन विभागातर्फे दि. १ जुलै ते ७ जुलै या सप्ताहभरात जागतिक वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राचे रेंज फॉरेस्ट अधिकारी बी. सी. चौधरी, रसाळ तसेच हरसूल वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी हा महोत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात वन विभाग त्र्यंबक नगरपालिका, देवस्थान ट्रस्ट, खासगी संस्था, सरकारी कार्यालयांची वृक्षलागवड जवळपास एक लाख होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. (वार्ताहर)