शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

७५ हजारांचे दागिने लंपास

By admin | Updated: June 22, 2017 18:43 IST

मागील काही दिवसांपासून द्वारका परिसरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

नाशिक : मागील काही दिवसांपासून द्वारका परिसरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरी व घरफोडीच्या घटनांनी या भागातील नागरिकांबरोबरच प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील बस थांब्यावर उभ्या असलेल्या एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वाहनात बसवून बॅगेमधील सोन्याचे दागिने भामट्यांनी लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, द्वारका-धुळे रस्त्यावर उभी असलेली एक प्रवासी महिला कळवण येथे जाण्यासाठी वाहनाची प्रतीक्षा करीत होती. यावेळी एका चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात इसमांनी या महिलेला कळवणला सोडून देतो, असे सांगून वाहनात बसविले. यावेळी संबंधित भामट्यांनी अपघात झाल्याचे कारण सांगून सुरतला जात असल्याची माहिती देत महिलेच्या बॅगेमधून हातोहात ७५ हजारांचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने, दोन ग्रॅमची बाळी असे दागिने लंपास केले आहे. सदरची माहिती महिलेचा पती देवीदास तुळशीराम मालपुरे (५३) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.सातत्याने गजबजलेला परिसर म्हणून द्वारका ओळखला जातो. नाशिक-पुणे, मुंबई, आग्रा, धुळे, कळवण आदि शहरांमध्ये जाणारी सर्व वाहने येथून मार्गस्थ होतात. प्रवाशांसह नागरिकांची कायम वर्दळ असते. यामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढविणे गरजेचे आहे. द्वारका परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या महिलेच्या लुटीच्या अगोदर अय्यप्पा मंदिरातून दीपस्तंभाची झालेली चोरी, निवृत्ती कॉम्प्लेक्समधील दुकानातून चोरीला गेलेले साहित्य अशा एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे द्वारका परिसर चर्चेत आला आहे. भद्रकाली पोलिसांच्या वतीने या भागात गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.