शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थेट इंधनातून एसटीला ७१ हजारांचा नफा

By admin | Updated: October 29, 2014 00:21 IST

थेट इंधनपुरवठा : एलबीटीमुळे मात्र नफ्यात घट

नाशिक : राज्य शासनाच्या निर्णयामुळे सुमारे वर्षभर खासगी पंपावर इंधन भरणाऱ्या परिवहन महामंडळाच्या पंपावर थेट इंधन आल्यानंतर मोठ्या प्रमाणात खरेदीदार असल्याचा लाभ परिवहन महामंडळाला मिळत असून, त्यामुळे महामंडळाला दैनंदिन स्वरूपात ७१ हजार रुपयांचा लाभ होतो आहे. परिवहन महामंडळाच्या शहरात दररोज सुमारे २२५ बसेस धावतात. त्यामधून सुमारे दोन लाख २५ हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते. २४ तास वाहतूक होणाऱ्या या प्रवासी वाहतुकीतून महामंडळाला दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते; परंतु मध्यंतरी शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फटका बसल्याने महामंडळाला थेट पुरवठा होणारे इंधन बंद झाल्याने बाहेरील पंपांवरून ते भरावे लागत असल्याने त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होऊ लागले. बाहेरील इंधनाचा दर्जाही तितकासा चांगला नसल्याने बसेसचा अ‍ॅव्हरेजही घसरला होता. त्यामुळे महामंडळाच्या नफ्यात घट होत होती. सुमारे वर्षभर हा प्रकार झाल्यानंतर अखेर राज्य शासनाने नुकतेच हे बंधन उठविल्याने महामंडळाच्या पंपावर पुन्हा थेट इंधन येऊ लागले आणि महामंडळाचा अतिरिक्त वेळ वाचला. या इंधनाचा पुरवठा होताना तो मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यात प्रत्येक लिटरमागे सुमारे एक रुपया दहा पैसे इतकी सूट मिळू लागली. महामंडळाला दररोज सर्व बसेसमध्ये ७० हजार लिटर इंधनाची गरज भासते. ते टाकताना सुटीची रक्कम वजा होत असल्याने दररोज ७१ हजार रुपयांचा नफा महामंडळाला होतो आहे; परंतु नाशिकमध्ये स्थानिक संस्था कर असल्याने त्यातही एक रुपयापेक्षा जास्त कर महामंडळाला मनपाकडे सुपूर्द करावा लागत असल्याने अपेक्षित नफा होऊ शकत नाही. जर मनपाने महामंडळाला त्या करात सूट दिली अथवा माफी दिली तर महामंडळाच्या नफ्यात आणखी वाढ होऊ शकेल.